News Flash

हक्कानी नेटवर्कविरुद्ध कारवाईची अमेरिकेची पाकला सूचना

हक्कानी नेटवर्कविरुद्ध ‘ठोस कारवाई’ करून दहशतवादी गटांमध्ये भेदभाव न करण्याची आपली बांधिलकी कायम राखावी

| April 25, 2016 12:03 am

हक्कानी नेटवर्कविरुद्ध ‘ठोस कारवाई’ करून दहशतवादी गटांमध्ये भेदभाव न करण्याची आपली बांधिलकी कायम राखावी, असे अमेरिकेने पाकिस्तानला सांगितले आहे. गेल्या आठवडय़ात ७० जणांचे बळी घेणाऱ्या काबूलमधील दहशतवादी हल्ल्याचा याला संदर्भ असल्याचे एका वरिष्ठ अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले.

पाकिस्तानच्या भूमीवरून कार्यरत असलेल्या हक्कानी नेटवर्कसारख्या अफगाणी तालिबान गटांच्या कारवाया पाकिस्तान चालवून घेत असल्याबद्दल आम्ही पाकिस्तान सरकारच्या उच्च पातळीवरील नेतृत्वाला आमची चिंता कळवली आहे, असे स्टेट डिपार्टमेंटच्या प्रवक्त्या एलिझाबेथ त्रुद्यो म्हणाल्या.

१९ एप्रिलला अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने ही काळजी पुन्हा पाकिस्तानला बोलून दाखवली. हा हल्ला हक्कानी नेटवर्कने केल्याचा आणि त्यांना पाकिस्तान सरकारचा पाठिंबा असल्याचा अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांचा आरोप आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2016 12:03 am

Web Title: take concrete action against haqqani network us to pakistan
Next Stories
1 बांगलादेशातील प्राध्यापकाच्या खूनप्रकरणी एक ताब्यात
2 इक्वेडोरच्या भूकंपातील बळींची संख्या ६५४ वर
3 राष्ट्रवादावर चर्चेसाठी तुम्हाला निवडून दिलेले नाही, कन्हैयाची पुन्हा मोदींवर टीका
Just Now!
X