News Flash

पक्षश्रेष्ठींकडे येण्यापेक्षा स्थानिक पातळीवर निर्णय घ्या -राहुल गांधी

पक्षश्रेष्ठींवर निर्णय सोपवण्यापेक्षा राज्य पातळीवर निर्णय घेतले तर उत्तम होईल, याचा पुनरुच्चार काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. हक्कांसाठी झगडलेच पाहिजे असा संदेश त्यांनी राज्यातील

| April 26, 2013 05:17 am

पक्षश्रेष्ठींवर निर्णय सोपवण्यापेक्षा राज्य पातळीवर निर्णय घेतले तर उत्तम होईल, याचा पुनरुच्चार काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. हक्कांसाठी झगडलेच पाहिजे असा संदेश त्यांनी राज्यातील निमंत्रित काँग्रेस नेत्यांशी संवाद साधताना दिला.
काँग्रेस पक्ष हा माझा किंवा तुमचा नाही, तर तो संपूर्ण देशाचा आहे. एकेकाळी अल्पसंख्याक, दुर्बल घटक काँग्रेस पक्षाबरोबर होते. मात्र अनेकांनी पक्षाची साथ सोडली. ते पुन्हा काँग्रेसशी कसे जोडले जातील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे राहुल गांधींनी सांगितले. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीतल्या २००३ आणि २००८ मधील चुका यावेळी टाळायला हव्यात. या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीला एकदिलाने सामोरे गेल्यास विजय मिळवण्याची क्षमता पक्षात असल्याचे राहुल यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2013 5:17 am

Web Title: take decision on local lavel insted coming to high command rahul gandhi
Next Stories
1 भारताची शाब्दिक इशारेबाजी
2 जेपीसीतील युद्ध पेटले!
3 निदर्शकांवर पोलिसी बळ वापरल्याने न्यायालयाचे स्पष्टीकरण मागवले
Just Now!
X