सध्या संपूर्ण देशात निपाह विषाणूने दहशत निर्माण केली असून केरळमध्ये आतापर्यंत निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याने दहाजणांचा मृत्यू झाला आहे. डुक्कर, वटवाघुळ आणि दूषित फळांमधून हा आजार पसरत असल्याने यापुढे फळे खाताना काळजी घेण्याची गरज आहे.

– निपाह विषाणूचा संसर्ग झालेले डुक्कर, प्राणी आणि दूषित फळे खाल्ल्यामुळे हा आजार पसरतो.

– अनेकदा रात्रीच्यावेळी फिरणारी वटवाघुळे झाडाला लागलेली फळे अर्धवट खाऊन सोडून देतात अशी फळे खाल्ल्यामुळे निपाहची लागण होऊ शकते.

– निपाह झालेल्या व्यक्तिच्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो.

– निपाह विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी झाडावरुन पडलेले कुठलेही फळ खाऊ नये.

– दक्षिणपूर्व आशिया आणि आफ्रिका खंडात निपाह विषाणूचा प्रसार करणाऱ्या वटवाघुळाच्या अनेक प्रजाती आहेत.

– वटवाघुळे अनेकदा केळी, खजूर, आंबा आणि रसदार फळे अर्धवट खाऊन सोडून देतात.

– वटवाघुळे कधीही फणसाच्या झाडावर जात नाही पण आंबे आणि चिक्कू खातात कारण ही फळे नरम असतात. त्यामुळे खाली पडलेले आंबे, चिकू खाऊ नयेत.