01 December 2020

News Flash

शरीफ यांच्या पक्षाच्या नेत्यांवर हल्ले चढवा

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पक्षाच्या नेत्यांवर हल्ले चढविण्याचा आदेश पाकिस्तान तालिबानच्या म्होरक्याने दहशतवाद्यांना दिला असून तशा आशयाचा फतवाच जारी केला आहे.

| January 10, 2015 01:46 am

पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पक्षाच्या नेत्यांवर हल्ले चढविण्याचा आदेश पाकिस्तान तालिबानच्या म्होरक्याने दहशतवाद्यांना दिला असून तशा आशयाचा फतवाच जारी केला आहे. फाशीच्या शिक्षेवर घालण्यात आलेली बंदी उठवून दहशतवाद्यांविरोधातील खटले चालविण्यासाठी लष्करी न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने हा फतवा जारी करण्यात आला आहे.
पीएमएल-एन पक्षाच्या नेत्यांवर जोरदार हल्ले चढवावे, कारण त्यामुळे ते वठणीवर येतील अथवा नरकात जातील, असा व्हिडीओ संदेश तहरिक-ए-तालिबानचा म्होरक्या मुल्लाह फझलुल्लाह याने अफगाणिस्तातून दिला आहे.यापूर्वी अवामी नॅशनल पार्टी आमचा मुख्य शत्रू होता, मात्र आता पीएमएल-एन हा आपला मुख्य शत्रू असल्याचे फर्मान पाकिस्तानातील जिहादचा भाग असलेल्या सर्व मुजाहिद्दिनांना सोडण्यात आले आहे, असे फझलुल्लाह याने म्हटले आहे. तो पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवरील कुनार प्रांतात लपला आहे.मुल्लाह फझलुल्लाह हा पेशावरमध्ये शाळेवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असून त्याला ठार करणाऱ्यास अथवा त्याच्याबाबतची माहिती देणाऱ्यास खेबर-पख्तुन्वा सरकारने १० दशलक्ष रुपयांचे इनाम जाहीर केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 1:46 am

Web Title: taliban chief mullah fazlullah orders militants to target sharifs party
Next Stories
1 ‘काचमणी’ कलेला भौगोलिक ओळख
2 पुष्कर मृत्यू प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा – थरूर
3 शरीफ पाकिस्तानातील सर्वात धनाढय़ राजकीय नेते
Just Now!
X