News Flash

अखुंडजादा याचा अजून तरी तालिबानवर फारसा प्रभाव नाही

न्यूयॉर्क टाइम्सने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार तालिबानचा नवा नेता अखुंडजादा हा नवीन असला

| July 14, 2016 12:10 am

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तातील माहिती

तालिबानचा नवा प्रमुख मवलावी हैबतुल्ला अखुंडजादा याची संघटनेवर पकड नसून, त्याचा माजी प्रमुख महंमद मन्सूर याच्याइतका प्रभाव नाही, असे एका वृत्तात म्हटले आहे. मन्सूरची निर्णयक्षमताही अखुंडजादा याच्यापेक्षा जास्त होती. अखुंडजादा याच्या नाकर्तेपणामुळे तालिबानचे निर्णय क्वेट्टा येथील एका मंडळाच्या ताब्यात आले असून, जुने मुल्ला मौलवी व तालिबानचे काही नवीन लोक यांचे हे मंडळ आहे.

न्यूयॉर्क टाइम्सने याबाबत दिलेल्या वृत्तानुसार तालिबानचा नवा नेता अखुंडजादा हा नवीन असला व तो धार्मिक विद्वान असला तरी त्याच्यात मन्सूरइतकी जिद्द नाही. तालिबानची सूत्रे स्वीकारल्यानंतर दोन महिन्यांनीही तालिबान संघटनेतील पदाधिकाऱ्यांबाबत गूढ कायम आहे. अखुंडजादा याला अजून दहशतवादाच्या क्षेत्रात ठसा उमटवता आलेला नाही व त्याला अंतर्गत वादांनाच तोंड द्यावे लागत आहे. त्याची संघटनेवर पकड व प्रभाव नाही. मन्सूर हा अमेरिकेच्या मे महिन्यातील ड्रोन कारवाईत मारला गेला होता. काही कमांडर्सनी अखुंडजादाच्या हाताखाली काम करण्यास नकार दिला आहे असे तालिबान कमांडर्सच्या मुलाखतीतून दिसत आहे. अखुंडजादा याला प्रमुख नेमल्यापासून तालिबानची निर्णय प्रक्रिया आता क्वेट्टा येथील एका राजकीय मंडळाच्या हातात आली आहे, ज्यात काही धर्मगुरू व कमांडर्स यांचा समावेश आहे. त्यात जुनी व नवी पिढी असे वाद आहेत.

अफगाणिस्तान अ‍ॅनॅलिस्ट नेटवर्कचे संशोधक बोरहान ओस्मान यांनी सांगितले, की तालिबानचा प्रमुख अखुंडजादा याची कामगिरी ते स्वत:साठी संघटनेत कशी जागा निर्माण करतो, शुरा या मंडळावर कसा प्रभाव टाकतो यावर अवलंबून आहे. तो जुन्या मूलतत्त्ववादी गटांशी अजून संबंध ठेवून आहे.

तो शांत व समजदार आहे असे कंदाहार येथील त्याचे जन्मस्थान असलेल्या रिगी गावातील वृद्ध गृहस्थ हाजी सैफीदाद यांनी सांगितले. त्याची तुलना अनेकदा संस्थापक मुल्ला महंमद ओमर याच्याशी केली जाते. कारण मुल्लाची शैली मन्सूरपेक्षा वेगळी होती.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 12:10 am

Web Title: talibans new leader more scholar than fighter is slow to impose himself
Next Stories
1 पाहा: मद्यपी पोलीस अधिकाऱयाचा भर रस्त्यात धिंगाणा
2 सुषमा स्वराज यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा
3 भारतीय प्राध्यापकाची अमेरिकेमधील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती
Just Now!
X