News Flash

American Research: घरात विनामास्क बोलण्याने करोना पसरण्याचा जास्त धोका

घरात किंवा बंद खोलीत विनामास्क बोलण्यामुळे करोना पसरण्याचा जास्त धोका असतो, असे एका अमेरिकन अभ्यासात म्हटले आहे.

American Research: घरात विनामास्क बोलण्याने करोना पसरण्याचा जास्त धोका (photo pti)

घरात किंवा बंद खोलीत विनामास्क बोलण्याने करोना पसरण्याचा जास्त धोका असतो, असे एका अमेरिकन अभ्यासात म्हटले आहे. घरात संभाषणादरम्यान वेगवेगळ्या आकाराचे श्वसन कण तोंडातून बाहेर पडतात.  यामध्ये वेगवेगळ्या प्रमाणात करोना विषाणू असू शकतो. तोंडावाटे पसरणारे कण जास्त चिंताजनक आहेत, जे काही मिनीटे हवेत राहतात. तसेच हे कण हवेच्या प्रवाहामुळे जास्त दुर पसरू शकतात, असे अमेरिकेच्या संशोधनात म्हटले आहे.

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डायबेटिस अ‍ॅंड डायजेस्टिव्ह अँड किडनी रोगांचे संशोधक एड्रियान बेक्स म्हणाले, जेव्हा लोकं बोलतात तेव्हा हजारो कण तोंडातून बाहेर पडतात. जे आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. बोलतांना बाहेर पडणाऱ्या  विषाणू-युक्त कण वाफे स्वरूपात असतात. ते काही मिनिटे धुरासारखे हवेमध्ये तरंगतात. त्यामुळे इतरांना त्याचा धोका असतो.

हेही वाचा – लस घेण्याआधी आणि नंतर काय खावे व काय खाऊ नये? जाणून घ्या

मास्क न घालता संवाद साधल्यामुळे इतरांना मोठा धोका

करोना साथीचा रोग सुरू झाल्यापासून विषाणूंमधील एयरोसोलच्या थेंबांच्या शारिरीक आणि रोगनिदानविषयक पैलूंवर अभ्यासकांनी अभ्यास केला. वैज्ञानिकांनी असा निष्कर्ष काढला की, एयरोसोल केवळ करोना पसरण्याचा मुख्य मार्ग नाही तर मास्क न घालता मर्यादीत जागेत संवाद साधल्यामुळे इतरांना मोठा धोका असतो.

संशोधकांनी असे सांगितले की, खाणे-पिणे बहुतेकदा घरातच होते. सहसा यावेळी लोकं मोठ्याने बोलतात. त्यामुळे करोना पसरतो. आपण असे म्हणू शकत नाही की फक्त बार आणि रेस्टॉरंट्स करोना विषाणूचे सुपर स्प्रेडर बनले आहेत. इंटर्नल मेडिसीन या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 9, 2021 8:04 pm

Web Title: talking at home without a mask increases the risk of spreading corona srk 94
Next Stories
1 दिल्ली : गायब झालेला रॅप गायक MC Kode अखेर सापडला! इन्स्टावर केली होती सुसाईड पोस्ट!
2 Corona Vaccination : खासदार ओवेसी यांचा लस घेतल्याचा फोटो व्हायरल होताच बिहारमध्ये लसीकरणाला वेग
3 अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच पसरतोय करोना, शेतकरी नेते राकेश टिकैत यांची टीका
Just Now!
X