दहशतवादी आणि त्यांची विचारधारा संपवण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र काम करण्यास कटिबद्ध आहेत. त्यामुळेच पाकिस्तानच्या सीमेवर असणाऱ्या दहशतवादी संघटना मोडीत काढण्यासाठी माझ्या कार्यालयाकडून पाकिस्तानसोबत चर्चा सुरु आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. गुजरातमधील मोटेरा स्टेडियममध्ये आयोजित ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांच्या या भुमिकेचे स्टेडियममधील लाखो लोकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

ट्रम्प म्हणाले, “माझ्या कार्यकाळात अमेरिकन सैन्याला आयसिसविरोधात लढण्याची खुली सूट देण्यात आली. त्यामुळेच आयसिसच्या म्होरक्याचा खात्मा करण्यात आला आहे. तसेच राक्षसी बगदादीलाही संपवण्यात आम्हाला यश आहे.”

आणखी वाचा – दहशतवाद थांबवा!; भारतात येऊन ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिला दम

पाकिस्तानबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले, “आमच्या नागरिकांवर संकट बनलेल्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल. प्रत्येक देशाला आपल्या सीमांचे रक्षण करण्याचा अधिकार आहे. अमेरिका आणि भारत दहशतवाद आणि दहशतवादी विचारांशी लढत आहे. ट्रम्प प्रशासन पाकिस्तानसोबत चर्चा करीत आहे. पाकिस्तानी सीमेतील दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावीच लागेल. आमचे पाकिस्तानसोबत चांगले संबंध आहेत. आम्हाला वाटतयं की पाकिस्तान याबाबत काही पावलं उचलेलं. हे संपूर्ण दक्षिण आशियासाठी गरजेचं आहे”

आणखी वाचा – Video: ट्रम्प यांनी भाषणात Radical Islamic Terrorism चा उल्लेख करताच…

“आम्ही सर्वाधिक चांगली विमानं, रॉकेट, जहाजं, खतरनाक शस्त्रात्रांची निर्मिती करतो. एरियल व्हेईकल या डिफेन्स सिस्टिमचा व्यवहारही शेवटच्या टप्प्यात आहे. आम्ही ही सिस्टिम भारतीय सैन्याला देणार आहोत. मला वाटतं की अमेरिकेनं भारताचा सर्वांत मोठा डिफेन्स पार्टनर व्हायला हवं. ज्यामुळे इंडो-पॅसिफिक रिजनला सुरक्षित ठेवता येईल,” असंही यावेळी ट्रम्प म्हणाले.