तामिळनाडूच्या चेन्नई शहरातील कंदनचावडी भागातील निर्माणधीन इमारत कोसळून १७ जणं जखमी झाल्याची घटना समोर येते आहे. ANI या वृत्तसंस्थेने या संदर्भातलं वृत्त दिलेलं असून, ८ अॅम्बुलन्स, ३ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झालेल्या आहेत. जखमी झालेल्या लोकांव्यतिरीक्त अनेक जणं ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. सध्या स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आलेली आहे.

काही कामगार हे अपघातावेळी बांबूच्या ढाच्यावर उभं राहून काम करत होते, त्याच दरम्यान या इमारतीचा डोलारा कोसळल्याची स्थानिक पोलिसांनी माहिती दिली आहे. अग्निशमदन दलाचे जवान आणि पोलिसांनी १७ जणांना या ढिगाऱ्यातून सोडवलं असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे सर्व कामगार हे परप्रांतीय असल्याचं कळतं आहे.