11 August 2020

News Flash

तामिळनाडू : टिव्ही चॅनल बदलायला सांगितल्याचा राग, अल्पवयीन मुलीची गळा आवळून हत्या

पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक

शेजाऱ्यांकडे टिव्ही पाहण्यासाठी गेलेल्या ७ वर्षीय अल्पवयीन मुलीने चॅनल बदलायला सांगितल्याच्या रागामधून तिची गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. बुधवारी हा प्रकार घडला असून पोलिसांनी या प्रकरणात दोघांना अटक केली असून या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली आहे. तामिळनाडूच्या थुट्टुकुडी जिल्ह्यातील सथंकुलम शहरात हा प्रकार घडला.

घरात वीज नसल्यामुळे पीडीत मुलगी नेहमी टिव्ही पाहण्यासाठी शेजारी जायची. ज्या दिवशी हा प्रकार घडला, त्यावेळी पीडित मुलीच्या शेजाऱ्याचं आपल्या वडिलांशी भांडण सुरु होतं. त्यातच मुलीने चॅनल बदलण्यासाठी शेजाऱ्याकडे रिमोटची मागणी केली. यावेळी संतापलेल्या शेजाऱ्याने या मुलीचा गळा आवळून तिची हत्या केली. भानावर आल्यानंतर शेजाऱ्याने या मुलीला घरातील प्लास्टिकच्या पिंपात ठेवून त्यावर कचरा टाकला. मित्रांच्या सहाय्याने आरोपीने हे पिंप घरापासून दोन किलोमीटर अंतराजवळ असलेल्या कालव्याच्या ठिकाणी नेऊन पुरलं.

स्थानिक गावकरी आणि पीडित मुलीच्या नातेवाईकांनी गुन्हा घडण्याच्या वेळी आरोपी नशेत होते आणि त्यांनी मुलीचा लैंगिक छळ केल्याचीही तक्रार केली. परंतू पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही. पीडित मुलीची आई ही रोजंदारीवर काम करते. कालव्याजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीला प्लास्टिकचं पिंप संशयास्पद रितीने पुरलेलं दिसताच त्याने याविषयी पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवत दोन आरोपींना अटक केली आहे. दोन्ही आरोपींनी आपला गुन्हा मान्य केला असून त्यांच्याविरोधात POSCO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 5:30 pm

Web Title: tamil nadu 7 year old strangled to death by neighbour for asking him to change channel 2 arrested psd 91
Next Stories
1 पाकिस्तानने मान्य केली भारताची मागणी, कुलभूषण जाधव यांना भेटण्याची दिली परवानगी
2 World Snake Day : सर्पदंशाने गेल्या २० वर्षात देशात १२ लाख मृत्यू
3 भारताला रोखण्यासाठी पाकिस्तान POK मध्ये पद्धतशीरपणे वाढवतोय चिनी गुंतवणूक
Just Now!
X