दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचा निर्णय तामिळनाडू सरकारने घेतला असून याबाबत केंद्र सरकारने अभिप्राय द्यावा, अशी मागणी केली आहे.
केंद्रीय गृहसचिव राजीव मेहरषी यांना पाठविलेल्या पत्रात तामिळनाडूचे मुख्य सचिव के. ज्ञानदेसिकन यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारकडे सात आरोपींचे अर्ज प्राप्त झाले आहेत.
आपण २० वर्षांहून अधिक काळ कारागृहात असल्याने आमची सुटका करावी, अशी विनंती त्यांनी केली असल्याचे पत्रात म्हटले आहे.
तामिळनाडू सरकारने १९ फेब्रुवारी २०१४ रोजी आरोपींची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागितली होती.