तामिळनाडूत १६ मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी घटक पक्षांसमवेत जागावाटपाची चर्चा करण्यासाठी द्रमुकने शनिवारी पक्षाचे कोषाध्यक्ष एम. के.स्टालिन यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची समिती जाहीर केली.

या समितीमध्ये स्टालिन यांच्यासह दुराई मुरुगन आणि आय. पेरियासामी हे माजी मंत्री आणि संघटन सचिव आर. एस. भारती यांचा समावेश आहे. काँग्रेस आणि आययूएमएल हे द्रमुकचे घटक पक्ष आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीपासून पक्षाला कट्टर प्रतिस्पर्धी अभाअद्रमुककडून सातत्याने पराभव पत्करावा लागत आहे. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीतही द्रमुकला एकही जागा मिळाली नाही.

अभिनेते विजयकान्त यांच्या डीएमडीके पक्षाशी आघाडी करण्याचे द्रमुकचे अध्यक्ष एम. करुणानिधी यांचे प्रयत्न असफल ठरले. विजयकान्त यांनी निवडणुका स्वबळावर लढण्याचे जाहीर केले.