पोलीस खात्याला मान शरमेनं खाली घालायला लावणारी घटना उजेडात आली आहे. तामिळनाडूच्या त्रिचीमधील सोमरसमपेट्टाई पोलीस ठाण्यातील ही घटना आहे. येथे एका महिला कॉन्स्टेबलने पोलीस अधिकाऱ्यावर पोलीस ठाण्यातच बळजबरी केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्याच्या जवळपास एक आठड्यानंतर रविवारी(दि.16) आरोपी पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणाची चौकशी सुरू आहे.

संबंधित पोलीस अधिकाऱ्याने बळजबरी किस केल्याचा आरोप या महिला कॉन्स्टेबलने केला. या प्रकरणी पीडितेनं तक्रार दिल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं, गुन्हा मात्र रविवारी दाखल झाला. मी विरोध करत असतानाही पोलीस अधिकाऱ्यांनी बळजबरी करत वारंवार किस केलं, अखेर त्यांना धक्का देऊन मी माझ्या जागेवरुन उठले आणि बाहेर निघून गेले असा आरोप या महिला पोलिसाने केला आहे.

हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. बाळ सुब्रमण्यम (वय -50) निलंबीत करण्यात आलेल्या विशेष पोलीस उप निरीक्षकाचे नाव आहे. मात्र या प्रकरणात दोन बाजू समोर येत आहेत. सुब्रमण्यम यांनी आपल्यावरील आरोप नाकारले असून हे संगनमताने करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची सखोल चौकशी करुन न्याय निवाडा करावा. आपण तामिळनाडू पोलिसांकडून प्रतिसादाची प्रतीक्षा करीत आहोत असं ते म्हणालेत. दरम्यान या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे महिला कुठेच सुरक्षित नाहीत काय हा प्रश्न उपस्थित होतोय. पाहा व्हिडीओ –

(Video Credit : News 18 Tamilnadu)