News Flash

राष्ट्राध्यक्षांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जमले हजारो समर्थक; चेंगराचेंगरीत ४५ जणांचा मृत्यू

पोलिसांनीच यासंदर्भातील माहिती प्रसारमाध्यमांना दिलीय

फोटो सौजन्य: एपी

आफ्रिकेमधील टांझानिया देशाचे दिवंगत राष्ट्राध्यक्ष जॉन मागुफूली यांच्या पार्थिवाचं दर्शन घेताना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मागील आठवड्यामध्ये घडली असली तरी यासंदर्भातील खुलासा टाझांनियामधील पोलिसांनी मंगळवारी केला आहे. यासंदर्भातील वृत्त असोसिएट प्रेस या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

नक्की वाचा >> “मी बोरिस जॉन्सन यांच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध ठेवलेत, आम्ही एकमेकांना सेक्शुअल फोटोही पाठवायचो”

दार ए सलेम येथे चेंगराचेंगरीची दुर्देवी घटना घडली. पोलीस दलाचे प्रमुख असणाऱ्या लजारो मम्बोसा यांनी दिलेल्य माहितीनुसार, मागुफूली यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक शहरामध्ये दाखल झाले होते. सर्वसामान्यांना दर्शन घेता यावं म्हणून दार ए सलेममधील एका स्टेडियममध्ये मागुफूली यांचं पार्थिव ठेवण्यात आलं होतं. मात्र या स्टेडियममध्ये नियोजित ठिकाणाहून प्रवेश करण्याऐवजी अनेक जण संरक्षक भिंतींवर चढून प्रवेश करत होती. त्याचवेळी एका बाजूची भिंत पडली आणि एकच गोंधळ उडाला. या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये ४५ जणांचा मृत्यू झालाय.

टांझानिया सरकारने दिलेल्या माहितीनुसार मागुफूली यांचा मृत्यू हृदयासंदर्भातील विकारामुळे झाला. मात्र विरोधी पक्षाने करोना संसर्गामुळे निर्माण झालेल्या मेडिकल कॉम्पिकेशनमुळे मागुफूली यांचा मृत्यू झाल्याचा दावा केलाय. भ्रष्टाचाराविरोधातीच कारवाई आणि आपल्या नेतृत्वशैलीमुळे मागुफूली हे टांझानियामध्ये प्रचंड लोकप्रिय होते. १७ मार्च २०२१ रोजी मागुफूली यांचं निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. मागुफूली यांच्यानंतर उपराष्ट्राध्यक्ष असणाऱ्या सामिया सुलुहू हसन या राष्ट्राध्यक्ष पदी विराजमान झाल्या आहेत. सामिया या टांझानियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष ठरल्यात. सामिया यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून मागुफूली यांना देशाच्या वतीने श्रद्धांजलीही अर्पण केली.

नक्की वाचा >> YouTube वर रेसिपी चॅनेल सुरु केल्याने गँगस्टर लागला पोलिसांच्या हाती; सात वर्षांपासून होता फरार

मागील वर्षी जून महिन्यामध्ये जगभरामध्ये करोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असतानाच मागुफूली यांनी टांझानिया करोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती.  देवाच्या कृपेने देशातून करोना विषाणू संपवण्यात यश आलं आहे, अशं मागुफूली म्हणाले होते. नागरिकांनी केलेल्या प्रार्थना, स्थानिक आरोग्य अधिकारी आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांमुळे करोनावर मात करणे शक्य झाले असा दावा मागुफूली यांनी केला होता. देशाची राजधानी असणाऱ्या डोडोमा येथील चर्चमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक प्रार्थनासभेच्या वेळी राष्ट्राध्यक्षांनी हे वक्तव्य केलं होतं. या प्रार्थनासभेसाठी अनेकजण मास्क न घालता आल्याचे निदर्शनास आणून देत राष्ट्राध्यक्षांनी हे करोनाबद्दलची भीती संपल्याचे लक्षण असल्याचे नमूद केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2021 6:05 pm

Web Title: tanzanian police say 45 died in stampede at john magufuli tribute scsg 91
Next Stories
1 “मी बोरिस जॉन्सन यांच्यासोबत अनेकदा शरीरसंबंध ठेवलेत, आम्ही एकमेकांना सेक्शुअल फोटोही पाठवायचो”
2 ममता बॅनर्जींचं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना पत्र; आवाहन करत म्हणाल्या…
3 “…तर टीव्ही ऑन करा आणि नरेंद्र मोदींचं तोंड बघा!” राहुल गांधींची बोचरी टीका!
Just Now!
X