25 September 2020

News Flash

करोनाबाधितांचे प्रमाण ५ टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्ट

प्रतिकात्मक छायाचित्र

सलग पाचव्या दिवशी करोनाच्या रुग्णांमध्ये ३० हजारांची वाढ झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये ३७ हजार १४८ रुग्णांची भर पडली. देशभरात जलद प्रतिद्रव नमुना चाचण्यांची संख्या वाढली असल्यानेही प्रतिदिन रुग्णांची संख्या वाढताना दिसते. मात्र, करोनाबाधितांचे प्रमाण ५ टक्क्यांवर आणण्याचे प्रमुख लक्ष्य असल्याचे मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

देशातील २३ एप्रिल ते २१ जुल या काळातील करोनाबाधितांचे राष्ट्रीय सरासरी प्रमाण ८.०७ टक्के आहे. एकूण नमुना चाचण्यांपैकी करोनाबाधित नमुन्यांचे प्रमाण म्हणजे करोनाबाधित होण्याचा दर. मंगळवारी हे प्रमाण ११.१४ टक्के होते. गेल्या आठवडय़ात हे प्रमाण १० टक्के होते. दोन आणि चार आठवडय़ांपूर्वी ते अनुक्रमे ९.७ टक्के व ८ टक्के होते. ३० राज्यांमध्ये करोनाबाधित होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

सुमारे १२०० वैद्यकीय प्रयोगशाळांमध्ये जलद प्रतिद्रव तसेच आरटी-पीसीआर चाचण्या केल्या जात असून गेल्या चोवीस तासांमध्ये ३ लाख ३४ हजार नमुना चाचण्या झाल्या. १० लाख लोकसंख्येमागे प्रतिदिन १८० चाचण्या केल्या जात आहेत. गेल्या चार आठवडय़ांमध्ये नमुना चाचण्यांची संख्या प्रतिदिन अनुक्रमे १.८७ लाख, २.४१ लाख आणि २.८७ लाखावर पोहोचली. कालांतराने नमुना चाचण्यांची प्रतिदिन क्षमता प्रतिदिन १० लाखांपर्यंत वाढवली जाणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे विशेष अधिकारी राजेश भूषण यांनी सांगितले.

देशात करोनारुग्णांची संख्या ११ लाख ५५ हजार १९१ झाली असून एकूण मृत्यू २८ हजार ८४ झाले आहेत. भारतात १० लाख लोकसंख्येमागे ८३७ लोकांना करोनाची बाधा झाली असून जगातील काही देशांमध्ये हे प्रमाण सुमारे १२ पटीने अधिक आहे. भारतात मृत्यूचे प्रमाणही २०.४ असून जगात हे प्रमाण ३३ पटीने जास्त आहे. देशभरात ४ लाख २ हजार ५२९ उपचाराधीन रुग्ण असून ७ लाख २४ हजार ५७७ करोनामुक्त झाले आहेत. करोना रुग्णांच्या मृत्यूचा दर (१७ जून ते २१ जुल) ३.३६ टक्क्यांवरून २.४३ टक्क्यांवर आलेला आहे. २२ राज्यांत हा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.

समूह संसर्ग नाही!

जागतिक आरोग्य संघटनेने समूह संसर्गाची ठोस व्याख्या केलेली नाही. मात्र, एखाद्या रुग्णाला कोणाच्या संपर्कात आल्यामुळे बाधा झाली असावी याचा शोध घेता येत नाही अशी स्थिती उद्भवण्याला समूह संसर्ग म्हणता येईल. अशी परिस्थिती अजूनही देशात निर्माण झालेली नाही. स्थानिक ठिकाणांमध्ये करोनाचा जास्त प्रादुर्भाव झालेला दिसतो, असे भूषण यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2020 12:11 am

Web Title: target to bring the proportion of coroners to 5 percent abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 दिल्लीत २४ टक्के लोकांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव
2 ऑक्सफर्ड लशीच्या निष्कर्षांचे भारतात तज्ज्ञांकडून स्वागत
3 सिरमच्या ५० टक्के लसी भारतीयांसाठी! लोकांना त्या विकत घ्याव्या लागणार नाहीत, अदर पूनावालांचा दावा
Just Now!
X