News Flash

आज नाही तर २१ मे ला लागणार तरुण तेजपाल प्रकऱणाचा निकाल…याविषयी सविस्तरपणे जाणून घ्या!

आपल्या सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तेजपाल यांच्यावर आहे.

संग्रहीत

तेहलका मॅगझिनचे माजी मुख्यसंपादक तरुण तेजपाल यांच्यावरच्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाचा आज निकाल लागणार होता. मात्र, आता या निकालाला २१ मेपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. तरुण तेजपाल यांची बाजू मांडणाऱे वकील सुहास वेलिप यांनी ही माहिती दिली आहे.

दोन ते तीन दिवसांपासून लाईट नसल्याने न्यायाधीशांना या प्रकरणाचा अभ्यास करता आला नाही आणि त्यामुळे त्यांना अधिक वेळ हवा असल्याने निकालाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचं अॅडव्होकेट वेलिप यांनी सांगितलं. गोव्याच्या सत्र न्यायालयामध्ये हा खटला सुरु आहे. पण नक्की हे काय प्रकरण आहे? हा खटला काय आहे त्याबद्दल जाणून घ्या सविस्तर माहिती!

तरुण तेजपाल हे तेहेलका मॅगझिनचे मुख्यसंपादक होते. २०१३मध्ये ते एका मोठ्या हॉटेलमध्ये लिफ्टमधून जात असताना त्यांनी आपल्या सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केले असा आरोप त्यांच्यावर आहे. गोवा पोलिसांनी लैंगिक अत्याचार प्रकरणी तेजपाल यांच्यावर नोव्हेंबर २०१३ मध्ये गुन्हा दाखल केला होता, त्या वेळी त्यांना अटक करण्यात आली. मे २०१४ पासून त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. गोव्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र निश्चिात करण्यास स्थगिती मागितली होती. पण ती याचिका फेटाळण्यात आली होती.

हेही वाचा- तरुण तेजपालप्रकरणी गोवा न्यायालयाकडून १९ मे रोजी निकाल

यापूर्वी या प्रकरणाचा निकाल २७ एप्रिलला लागणार असं जाहीर कऱण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर या निकालाला १९ मे पर्यंत स्थगिती देण्यात आली. आता हा निकाल २१ मेला जाहीर होणार असल्याचं न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 12:48 pm

Web Title: tarun tejpal case verdict will be declared on 21 may adjourned by court vsk 98
Next Stories
1 कुणीच वाचलं नसतं! अरबी समुद्रात मृत्यूला स्पर्शून आलेल्यांच्या अश्रूंचा फुटला बांध
2 अमृतसरमध्ये फायनान्स कर्मचाऱ्याचे हात कापून १५०० रुपये लुटले
3 भाजपा न सोडण्यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून मिळाली प्रेरणा; गडकरींनी सांगितला किस्सा
Just Now!
X