News Flash

जामिनासाठी तेजपाल सर्वोच्च न्यायालयात

तेहलकाचा संस्थापक संपादक तरुण तेजपाल याला उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्याने आता जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

| April 11, 2014 03:48 am

तेहलकाचा संस्थापक संपादक तरुण तेजपाल याला उच्च न्यायालयाने जामीन नाकारल्यानंतर त्याने आता जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. सहकारी महिला पत्रकारावर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपप्रकरणी तेजपालला काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली असून सध्या तो सडा येथील उपकारागृहात आहे. तेजपालच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवडय़ामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे.
तेजपालचा जामीन अर्ज बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला, असे त्याचे वकील संदीप कपूर यांनी येथे सांगितले. तेजपालविरोधातील सुनावणी दोन महिन्यांत सुरू होण्याचे कारण देत उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2014 3:48 am

Web Title: tarun tejpal moves supreme court to get bail after hcs refusal
Next Stories
1 विमानासंबंधी नवीन ध्वनिसंदेश मिळाल्याचा दावा
2 जेट विमानाचा संपर्क अर्धा तास खंडित
3 मुलायम यांची ‘नासमजवादी पार्टी’- वादग्रस्त विधानावर ट्विटरकरांच्या प्रतिक्रिया
Just Now!
X