News Flash

आजारी आईला भेटण्यासाठी तेजपाल यांची न्यायालयाला विनंती

आपल्या आजारी आईला भेटण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती तेहेलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांनी गुरुवारी न्यायालयाला केली.

| March 28, 2014 04:08 am

आपल्या आजारी आईला भेटण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती तेहेलकाचे संस्थापक संपादक तरुण तेजपाल यांनी गुरुवारी न्यायालयाला केली.
तेजपाल यांच्या आई उत्तर गोवा येथे राहत आहेत. अतिरिक्त सत्र न्यायालयात तेजपाल यांनी अर्ज दिला असून आपल्या आईची प्रकृती ठीक नसून त्यांना मेंदूचा कर्करोग झाला आहे. त्यांची तब्बेत खालावत असून त्यांना भेटण्याची परवागनी द्यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. तेजपाल यांनी उत्तर गोवा येथील मोइरा गावात घर घेतले आहे. त्यांच्या आईला रुग्णालयातून सोडल्यानंतर त्या याच घरात राहत आहेत. तेजपाल यांनी आपल्या आईला भेटण्यासाठी दुसऱ्यांदा अर्ज केला आहे. यापूर्वी १३ मार्चला न्यायालयाने तेजपाल यांना आपल्या आईला भेटण्यासाठी परवानगी दिली होती. बलात्काराच्या प्रकरणात तेजपाल सध्या शिक्षा भोगत आहेत.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2014 4:08 am

Web Title: tarun tejpal seeks goa courts permission to meet his mother again
टॅग : Tarun Tejpal
Next Stories
1 मुशर्फ खटल्याचे न्यायाधीश नाटय़
2 अमेरिकेकडून पाकला शस्त्ररसद
3 हे राष्ट्र धुरक्याचे!
Just Now!
X