नवी दिल्ली : आपल्या कथित गुन्ह्य़ाची वर्दी देणाराच या गुन्ह्य़ात तपास अधिकारीही असल्याबद्दल ‘तहलका’चा संस्थापक तरुण तेजपाल यांनी आक्षेप घेतला आहे. एका महिला सहकाऱ्यावर कथित लैंगिक अत्याचार केल्याचा तेजपाल याच्यावर आरोप आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या १६ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाचे न्या. रंजन गोगोई यांनी एका खटल्याचा निकाल देताना, जो गुन्ह्य़ाची वर्दी देतो त्यालाच तपास अधिकारी म्हणून नेमता येणार नाही, असे स्पष्ट केले होते. त्याचा हवाला या प्रकरणात अ‍ॅड. कपिल सिब्बल यांनी तेजपाल यांच्यावतीने दिला. तो निकाल देताना न्या. गोगोई म्हणाले होते की, ‘न्याय दिला जाणे नुसते पुरेसे नाही, तर तो खरंच दिल्याचे जाणवलेही पाहिजे. त्यामुळे कोणत्याही पूर्वग्रहदूषित तपासाची शक्यता उरता कामा नये.’

बलात्काराचा आरोप रद्द करण्याची तेजपाल याची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली असून त्याला त्याने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. प्रत्यक्ष सीसीटीव्ही चित्रीकरण आणि आपल्यावर विनयभंगाचा आरोप करणाऱ्या महिलेची जबानी यात वारंवार विसंगती आढळल्या आहेत, याकडेही तेजपाल याने लक्ष वेधले आहे.

१६ ऑगस्टला न्या. गोगोई यांनी दिलेल्या निकालाचा सखोल मागोवा घेऊ, असे सांगत न्या. ए. के. सिक्री आणि न्या. अशोक भूषण यांनी ही सुनावणी पुढील आठवडय़ापर्यंत तहकूब केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tarun tejpal to sc informant cannot be investigator in case against him
First published on: 22-08-2018 at 02:53 IST