हस्तमैथुन करणे हा अपराध मानू नये, असे मत प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरिन यांनी व्यक्त केले आहे. गेल्याच आठवड्यात दिल्लीतील बसमध्ये एका व्यक्तीने हस्तमैथुन केल्याचे प्रकरण समोर आले होते. त्या पार्श्वभूमीवर नसरिन यांनी आपले मत व्यक्त केले. परंतु, तस्लिमा यांच्या या ट्विटवर अनेकांनी असहमती दर्शवली आहे. दिल्लीत प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमध्ये एक व्यक्ती हस्तमैथुन करत होता. रेप कल्चरमध्ये याला मोठा अपराध समजला जाऊ नये. पुरूषांनी बलात्कार किंवा खून करण्याऐवजी हस्तमैथुनच करावं. सार्वजनिक स्थळावार हस्तमैथुन करणे गुन्हा आहे का ? खरं तर हा असा गुन्हा आहे की, ज्यामध्ये कोणी पीडित नसतं, असं ट्विट त्यांनी केले.

परंतु, तस्लिमा यांच्या या ट्विटला सोशल मीडियावर मोठा विरोध होताना दिसतोय. आम्ही मॉडर्न होत आहोत, याचा अर्थ असा नव्हे की आम्ही निर्लज्ज होतोय. हस्तमैथुन, शारीरिक संबंध सार्वजनिक ठिकाणावर योग्य नाही, असे एकाने म्हटले. तर एकाने हा गुन्हा असून अजाणतेपणे असे कृत्य पाहणाऱ्याला धक्का बसतो. याबाबत या व्यक्तीने आपल्याच एका नातेवाईकाचे उदाहरणही दिले आहे.

दिल्लीत भरगर्दीत धावत्या बसमध्ये तरुणीसमोरच केले हस्तमैथून

त्यानंतर तस्लिमा यांनी याप्रकरणी मंगळवारी आणखी एक ट्विट केले. यामध्ये लिहिले की, बस, रेलवे, गल्ली, गर्दीची जाग, विरळ वस्ती असलेली जागा, रात्र, दिवस, श्खाळा, ऑफिस इतकेच काय तर घरही महिलांसाठी सुरक्षित नाही. या सर्वांचे कारण आहे पुरूष, त्यांनी स्त्रियांबाबतचा आपला तिरस्कार कमी केला पाहिजे, म्हणजे अर्धी पिढी आरामात जगू शकेल. परंतु, पहिल्या ट्विटमधून तस्लिमांनी उपरोधिकपणे हे लिहिले होते का हे मात्र समजू शकलेले नाही.

काय आहे प्रकरण
दिल्ली विद्यापीठात शिकणारी तरुणी ७ फेब्रुवारी रोजी बसने वसंत व्हिलेजमधून आयआयटी गेट येथे जात होती. ‘सकाळी बसमध्ये गर्दी होती. माझ्या बाजूला बसलेला तरुण हस्तमैथुन करत होता. हा प्रकार बघून मला धक्काच बसला. मुलीसमोर हस्तमैथुन करणे हा गुन्हाच आहे हे देखील त्याला कळत नव्हते. त्याला धडा शिकवण्यासाठी मी या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर अपलोड केला. मी त्या तरुणाला जाबही विचारला. मात्र त्याने माझ्याकडे दुर्लक्ष केले, असे तिने म्हटले.