News Flash

टाटा मोटर्सच्या आठ सुधारीत कार बाजारात दाखल

बाजारात कंपनीच्या घसरलेल्या विक्री दराला वाढविण्याच्या उद्देशाने टाटा मोटार्स कंपनीने आज बुधवार आठ सुधारीत कार बाजारात दाखल केल्या आहेत. यात टाटा नॅनोचा 'सीएनजी' मॉडेलचाही समावेश

| June 19, 2013 05:04 am

बाजारात कंपनीच्या घसरलेल्या विक्री दराला वाढविण्याच्या उद्देशाने टाटा मोटार्स कंपनीने आज बुधवार आठ सुधारीत कार बाजारात दाखल केल्या आहेत. यात टाटा नॅनोचा ‘सीएनजी’ मॉडेलचाही समावेश आहे. त्याचबरोबर टाटा इंडीका कारचाही सीएनजी मॉडेल बाजारात दाखल करण्यात येणार आहे. सिदान इंडीगो मॉडेलमध्येही काही नव्याने बदल करण्यात आले आहेत.
टाटाची स्पोर्टस् कार सफारी स्ट्रोम आणि युटिलिटी कार सुमो गोल्ड यांचेही सुधारीत मॉडेल्स टाटा कंपनी बाजारात आणणार आहे. “गेले दोन महिने बाजारात विक्रीदर खालावला होता. पण, या नव्या सुधारित आवृत्यांमुळे विक्री दरात फरक पडेल अशी आम्हाला आशा आहे. ग्राहकही यांना चांगला प्रतिसाद देतील” असे टाटा मोटार्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्ल्यॅम पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 5:04 am

Web Title: tata motors launches 8 upgraded models of passenger vehicles
टॅग : Tata Motors
Next Stories
1 अमरनाथ यात्रा दहशतवाद्यांच्या रडारवर; कडक सुरक्षेचे आदेश
2 फूट पाडणारा नेता आम्हाला नको – नितीशकुमारांचा मोदींवर हल्लाबोल
3 काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; नियंत्रण रेषेवर पाककडून गोळीबार
Just Now!
X