20 September 2020

News Flash

टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांचा संशयास्पद मृत्यू

मोटार निर्मिती क्षेत्रात सुप्रसिद्ध टाटा मोटार्स लिमिटेडचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांचा बँकॉकमधील एका हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

| January 27, 2014 04:06 am

मोटार निर्मिती क्षेत्रात सुप्रसिद्ध टाटा मोटार्स लिमिटेडचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक कार्ल स्लिम यांचा बँकॉकमधील एका हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या जिन्यांवरून घसरून पडल्यामुळे कार्ल स्लिम यांचा मृत्यू झालाचे प्रथम दर्शनी दिसत आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर सविस्तर माहिती आणि मृत्यूचे कारण समजेल.५१ वर्षीय कार्ल स्लिम हे थायलंड येथील एका महत्वाच्या बैठकीसाठी बँकॉकला गेले होते. रविवारी संध्याकाळपर्यंत ते भारतात परतणार होते.
पोलिस अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. त्यांचा मृत्यू होण्यापूर्वी त्यांनी लिहिलेली तीन पानेही मिळाली आहेत. पुढील तपासात सर्वकाही स्पष्ट होईल. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2014 4:06 am

Web Title: tata motors md karl slym dies after falling from hotel floor
टॅग India News
Next Stories
1 काँग्रेसमुळे अराजकता; नरेंद्र मोदीच देशाचे तारणहार- रामदेवबाबा
2 माशेलकर पद्मविभूषण, दाभोलकरांना पद्मश्री
3 अडवाणी, मुरलीमनोहर जोशींना राज्यसभा?
Just Now!
X