News Flash

भारतीय लष्करासाठी टाटा मोटर्सनं खास डिझाईन केलेली ‘सफारी स्टॉर्म’

भारतीय सैन्यदलाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून ही गाडी तयार करण्यात आली आहे

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये टाटा मोटर्सच्या 1500 व्या जीएस 800 (जनरल सर्व्हिस 800) सफारी स्टॉर्म या गाडीचा प्रवेश झाला आहे. भारतीय सैन्यदलाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून ही गाडी तयार करण्यात आली आहे. पुण्यातील टाटा मोटर्सच्या प्रकल्पात केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाचे एमओएस डॉ. सुभाष भामरे आणि टाटा मोटर्सच्या सरकारी व्यापार व संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष वर्मन नोरोन्हा यांच्या उपस्थितीत ही गाडी लष्कराच्या स्वाधीन करण्यात आली.

‘टाटा जीएस 800 सफारी स्टॉर्म’ या गाडीमध्ये फॉग लॅम्प्स, रिकव्हरी हूक्स, जेरी कॅन आणि एबीएस ही वैशिष्ट्ये असून सैन्याच्या युद्धादरम्यानच्या सर्व गरजा यातून पूर्ण होऊ शकतात असं सांगण्यात आलं आहे. आणखी 3192 सफारी स्टॉर्म गाड्या सेनादलाला पुरवण्याची मागणी कंपनीकडे करण्यात आली असून यातील 1300 हून अधिक वाहनांची ‘डिलीव्हरी’ यापूर्वीच करण्यात आली आहे.

देशातील विविध भागांमध्ये या गाडीची जवळपास १५ महिने कसोशीने चाचणी घेण्यात आली. ऑन-रोड आणि ऑफ-रोड भागांतही गाडीचा पर्फोमन्स उत्तम राहिला आहे. 60 टक्के पेलोड, 70 टक्के ऊर्जा आणि 200 टक्क्यांहून अधिक टॉर्क असलेली ही गाडी उंच-सखल भागांत, बर्फाळ प्रदेशात, वाळवंटात तसेच, जंगलातही कोणत्याही परिस्थितीत सुरळीत चालवता येते. गाडीच्या देखभालीसाठीही कमी खर्च असून याला बकेट सीट्स, मोबाईल चार्जिंग पॉईंट, एसी, हिटिंग, पॉवर विण्डोज, डिमिस्टिंग या फिचर्ससह सहा जण आरामात बसू शकतील इतकी ऐसपैस जागा असून 800 किलो इतकी वहनक्षमता गाडीची आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 3:51 pm

Web Title: tata motors rolls out 1500th safari storme for the indian army
Next Stories
1 आरएसएसच्या कार्यक्रमाचे राहुल गांधींना आमंत्रण ?
2 पर्वतरांगांवर रात्रीच्या वास्तव्यास बंदी, हायकोर्टाचा निर्णय
3 कर्नल पुरोहितांच्या याचिकेवर नव्या खंडपीठासमोर सुनावणी होणार; न्या. लळित यांची माघार
Just Now!
X