टाटा मोटर्सने आपली कॉम्पॅक्ट सेडान इंडिगो आणि कॉम्पॅक्ट हॅचबॅक इंडिकाचे उत्पादन बंद केले आहे. कंपनीच्या मते, या कारची कमी झालेली विक्री आणि या सेगमेंटमध्ये वाढली स्पर्धा यामुळे या कारचे उत्पादन बंद करण्यात आले आहे.

कंपनीचे उत्पादन बंद झाले असले तरी सध्या बाजारात असलेल्या गाड्यांना सेवा पुरवण्यात येईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने या दोन्ही वाहनांचे उत्पादन बंद केले असून फक्त उपलब्ध असलेले शेवटच्या काही स्टॉकचा पुरवठा केला जाणार असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. इतकेच नव्हे तर भारतीय ऑटोमोबाइल उत्पादकांची संघटना सियामने जारी केलेल्या विक्री आणि उत्पादनांची आकडेवारीतूनही हे स्पष्ट होते.

Police Raid, Spa Centers, Hinjewadi, Wakad, sex racket, Rescue Eight Women, crime in Hinjewadi, crime in Wakad, crime in chinchwad, crime in pimpri, sex racket, prostitute, police raid on spa,
पिंपरी : आयटी हिंजवडी आणि उच्चभ्रू वाकडमध्ये स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; आठ महिलांची सुटका
GE Aerospace going to Invest Rs 240 Crore in Pune Plant Expansion
विमान इंजिनची निर्मिती करणाऱ्या जीई एरोस्पेसची पुण्यात मोठी गुंतवणूक
drug-resistant tuberculosis
औषध प्रतिरोध क्षयरोग नियंत्रणात, क्षय बरा होण्याचा दर २०२३ मध्ये ८२ टक्के
property tax mumbai
मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांवर कारवाई, मुंबई महानगरपालिकेचा इशारा

टाटा मोटर्सने एप्रिल २०१८ मध्ये १८७,३२१ यूनिट्सची विक्री केली असून यात २२ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. तर मागील वर्षी याच काळात १५३,१५१ यूनिट्सची विक्री झाली होती. ही वाढ मुख्यत: नुकतेच लाँच झालेले मॉडेल्स उदा. नेक्सॉन आणि हेक्सासारख्या कारच्या विक्रीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर कॉम्पॅक्ट हॅचबॅक टियागोचीही चांगली विक्री झाली आहे. यातुलनेत इंडिगो आणि इंडिकाची विक्री अपेक्षेपेक्षा कमी राहिली.

सियामद्वारे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, टाटा मोटर्सने आर्थिक वर्ष २०१८ मध्ये इंडिकाचे २,५८३ यूनिट्स आणि इंडिगोचे १,७५६ यूनिट्सची विक्री केली. त्यामुळेच एप्रिल २०१८ मध्ये दोन्ही कारचे उत्पादन आणि विक्रीही करण्यात आली नाही.