17 January 2021

News Flash

Coronavirus : टाटा ट्रस्टकडून अत्यावश्यक वस्तूंचं एअरलिफ्टींग; लवकरच गरजुंपर्यंत मदत पोहोचवणार

यापूर्वीही टाटा यांनी करोनाविरोधातील लढ्यात मोठी मदत केली होती.

देशात सध्या करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत अनेक लोकं, अनेक संस्थांनी या लढ्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ट्रस्टचीही करोनाविरुद्धच्या या लढ्यात मोलाची मदत मिळत आहे. करोना विरोधातील लढ्यामध्ये अत्यावश्यक वस्तूंचा देशभरात उपयोग व्हावा यासाठी टाटा ट्रस्टद्वारे या वस्तूंचं एअरलिफ्टींग करण्याचं काम सुरू आहे.टाटा इंटरनॅशनल लिमिटेडच्या सहयोगाने या वस्तू एअरलिफ्ट करण्यात आल्या. टाटा ग्रुप्सचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवर यासंबंधी एक व्हिडीओही शेअर केला आहे.

एअरलिफ्ट करण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये व्यक्तिगत बचाव उपकरणांचे किट्स म्हणजेच संपूर्ण शरीर झाकले जाईल असा संरक्षक सूट, एन९५/केएन९५ मास्क आणि विविध ग्रेडस्चे सर्जिकल मास्क्स, हातमोजे आणि गॉगल्स यांचा समावेश आहे. तसंच एका व्यक्तीसाठी एक युनिट अशाप्रकारच्या जवळपास एक कोटी युनिट्सचे कंसाइन्मेंट निरनिराळ्या बॅचेसमध्ये आणले जाणार आहेत. येत्या आठवड्यांमध्ये देशभरातील सर्वाधिक गरजू भागांमध्ये या वस्तूंचं वितरण करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आजवरच्या सर्वात गंभीर समस्यांपैकी एक असलेल्या करोना विरोधातील लढाईसाठी आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी तात्काळ आपत्कालीन साधने उपलब्ध करणे गरजेचे आहे, रतन टाटा एका निवेदनात म्हणाले होते. त्यानुसार टाटा ट्रस्टकडून हे काम हाती घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.

यापूर्वीही मोठी मदत
टाटा ग्रुप्सचे सर्वेसर्वा रतन टाटा यांनीही ५०० कोटी रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर लगेचच टाटा सन्सनेही एक हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली होती. या आर्थिक मदतीबरोबर टाटा ग्रुप्सच्या माध्यमातून डॉक्टरांच्या जेवणाची आणि राहण्याचीही सोय करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 6:37 pm

Web Title: tata trust tata international air india airlifting important goods to fight against coronavirus masks gloves jud 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 Coronavirus : देशभरात चोवीस तासांत 1 हजार 076 नवे रुग्ण, 32 मृत्यू
2 रुग्णालयात घेऊन जात असतानाच महिलेनं पोलिसांच्या गाडीत दिला मुलाला जन्म
3 देशातील कोविड-१९ रुग्णालयात १.७३ लाख आयसोलेशन बेड; आरोग्यमंत्रालयाची माहिती
Just Now!
X