News Flash

खाण उद्योग सुरू झाल्यानंतरच हवाई इंधन करावर सवलत – पर्रिकर

गोव्यातील खाण उद्योग सुरू झाल्यानंतरच हवाई इंधन करावर सवलत देण्याचा विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले.राज्यात खाणकाम सुरू झाल्यानंतर हवाई इंधन

| November 15, 2013 02:22 am

गोव्यातील खाण उद्योग सुरू झाल्यानंतरच हवाई इंधन करावर सवलत देण्याचा विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्ट केले.
राज्यात खाणकाम सुरू झाल्यानंतर हवाई इंधन करावर सध्या आकारण्यात येत असलेला १२ टक्के मूल्यवर्धित कर पाच टक्क्य़ांवर आणण्याचा विचार करता येईल, असे पर्रिकर यांनी सांगितले. सध्या राज्यातील खाण उद्योग बंद असल्यामुळे गेल्या वर्षभरापासून सरकारला मोठय़ा महसुलास मुकावे लागले आहे. हे प्रमाण २५ टक्के असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
दरम्यान, दाभोळी विमानतळावर सध्या अतिरिक्त इमारत उभारण्यात येत असली तरी दर वर्षी या विमानतळावरून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ४० लाखांच्या घरात आहे. या अतिरिक्त इमारतीचे उद्घाटन येत्या ३ डिसेंबर रोजी होणार असल्याचे पर्रिकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2013 2:22 am

Web Title: tax relief on jet fuel only after mining resumes parrikar
टॅग : Manohar Parrikar,Tax
Next Stories
1 बसप खासदारावर बलात्काराचा आरोप
2 आयएनएस विक्रमादित्य युद्धनौकेची प्रतीक्षा संपणार, उद्या नौदलात दाखल
3 भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा
Just Now!
X