News Flash

चप्पल घातल्याने आणि शर्टचं बटण न लावल्याने टॅक्सी चालकावर वाहतूक पोलिसांची कारवाई

चालकाला किती दंड ठोठावला जावा याचा निर्णय न्यायालय घेणार आहे

राजस्थानमध्ये वाहतूक पोलिसांनी एका टॅक्सी चालकावर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे चालकाने चप्पल घातली असल्याने तसंच शर्टचं बटण न लावल्याने वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. सध्या देशभरात नवीन मोटार वाहन कायद्यासंबंधी चर्चा सुरु असून त्याची अंमलबजावणी केली जावी की नाही यावरुन राज्यांमध्ये मतांतर आहे. देशातील अनेक ठिकाणी वाहनचालकांना लाखोंचा दंड ठोठावण्यात आल्याच्या अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. राजस्थानमध्ये अद्याप नवा कायदा लागू करण्यात आलेला नाही. मात्र पोलीस जुन्या कायद्याची अत्यंत काटेकोरपणे अंमलबाजवणी करताना दिसत आहेत.

६ सप्टेंबर रोजी जयपूरमध्ये ही घटना घडली आहे. वाहतूक पोलिसांनी संजय सर्कलजवळ टॅक्सी क्रमांक RJ14TE0556 च्या चालकावर नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. वाहतूक पोलीस कर्मचारी माधो सिंह यांनी ही कारवाई केली आहे. कारवाई करताना त्यांनी चालकाने शर्टचं बटण लावलं नसल्याचं तसंच वाहन चालवताना चप्पल घातली असल्याचा उल्लेख केला आहे.

दरम्यान चालकाला किती दंड ठोठावला जावा याचा निर्णय न्यायालय घेणार आहे. राजस्थान सरकारने अद्याप नवीन मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. “आम्ही अद्याप नवीन मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी केलेली नाही. इतर राज्यं काय करत आहेत हे आम्ही पाहत आहोत. आम्ही कठोर शिक्षा नसणारा कायदा लागू करण्याचा विचार करत आहोत,” अशी माहिती राजस्थानचे वाहतूक मंत्री प्रताप सिंग यांनी दिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2019 12:53 pm

Web Title: taxi driver challaned for wearing slippers unbuttoned shirt in jaipur motor vehicles act sgy 87
Next Stories
1 WhatsApp वरील फेक फोटोचे बळी ठरले शशी थरूर; मान्य केली चूक
2 गोव्यात न्यूड पार्टीचे पोस्टर्स; पोलिसांनी सुरू केला तपास
3 पोलिसांना चौकशीदरम्यान स्थावर मालमत्ता जप्तीचा अधिकार नाही – सुप्रीम कोर्ट
Just Now!
X