29 May 2020

News Flash

लग्नानंतर चार महिन्यात शिक्षिकेची प्रसुती, शाळेकडून हकालपट्टी

लग्नानंतर अवघ्या चार महिन्यात शिक्षिकेची प्रसुती झाल्यामुळे शाळेने तिला नोकरीवरुन काढून टाकले आहे.

संग्रहित छायाचित्र

लग्नानंतर अवघ्या चार महिन्यात शिक्षिकेची प्रसुती झाल्यामुळे शाळेने तिला नोकरीवरुन काढून टाकले आहे. केरळच्या कोट्टाक्कल येथील पूर्व प्राथमिक शाळेत ही शिक्षिका नोकरीला होती. प्रसुती रजा संपल्यानंतर शाळेचे प्रशासन आणि पालक-शिक्षक संघटना कामावर रुजू होऊ देत नसल्याबद्दल या शिक्षिकेने आता पोलिसात धाव घेतली आहे. पीटीएच्या बैठकीत पालक-शिक्षकांनी आपल्याला भरपूर अपशब्द सुनावले असा आरोप शिक्षिकेने केला आहे.

कोट्टाक्कल पोलीस या ३३ वर्षीय शिक्षिकेची जबानी नोंदवून घेणार आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ही शिक्षिका या शाळेत नोकरी करत आहे. पहिल्या पतीपासून घटस्फोट घेऊन या शिक्षिकेने दुसरे लग्न केले आहे. पहिल्या लग्नाच्या घटस्फोटाची प्रक्रिया लांबली होती. त्याच दरम्यान तिने कायदेशीर दुसरे लग्न करण्याआधी भावी पतीसोबत एकत्र रहायला सुरुवात केली. मागच्यावर्षी जून २०१८ मध्ये तिने दुसरे कायदेशीर लग्न केले. लग्नानंतर चार महिन्यांनी तिने प्रसुती रजेसाठी अर्ज केला.

प्रसुती रजेसाठी अर्ज केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने बाळाला जन्म दिला. जानेवारी २०१९ मध्ये प्रसुती रजेचा कालावधी संपल्यानंतर जेव्हा मी पुन्हा शाळेत रुजू होण्यासाठी आली. तेव्हा शाळेने लग्नानंतर चार महिन्यात प्रसुती रजेसाठी अर्ज केल्याचे कारण सांगून पुन्हा मला कामावर घेण्यास नकार दिला असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. शाळेवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी या शिक्षिकेने बाल हक्क आयोगाकडे अर्ज केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2019 2:00 pm

Web Title: teacher gives birth four months after marriage school expel her kerala dmp 82
Next Stories
1 अजब ! वैमानिकाने जेवणाचा डबा धुवायला सांगितल्याने विमानाला उशीर
2 काँग्रेसला आम्ही सत्तेत येऊच देणार नाही – आठवले
3 हिजबुल मुजाहिद्दीनचे पाच दहशतवादी ताब्यात
Just Now!
X