News Flash

बायकोच्या शाळेच्या पार्टीत नवऱ्याचा गोळीबार, पत्नी जखमी

बायको रात्री उशिरापर्यंत पार्टीमध्ये थांबली म्हणून नवऱ्याने तिच्यावर गोळी झाडून तिला जखमी केले. पेशाने शिक्षिका असलेली ही महिला फॅशन शो मध्ये सहभागी झाली होती.

बायको रात्री उशिरापर्यंत पार्टीमध्ये थांबली म्हणून नवऱ्याने तिच्यावर गोळीबार केला. गुरुग्राममध्ये ही धक्कादायक घटना घडली. पेशाने शिक्षिका असलेली ही महिला शाळेने आयोजित केलेल्या फॅशन शो मध्ये सहभागी झाली होती. सिटी क्लबमध्ये हा फॅशन शो आयोजित केला होता. नवरा तिला घरी घेऊन जाण्यासाठी कार्यक्रम स्थळी पोहोचला. तिने सोबत येण्यास नकार दिला.

संतापाच्या भरात त्याने बंदूक काढली व मोठया स्क्रीनच्या दिशेने गोळी झाडली. नंतर पत्नीच्या पायावर गोळीबार केला व तिथून फरार झाला. आशा रानी (३२) उर्फ अंशू मागच्या काही महिन्यांपासून एका खासगी शाळेत शिक्षिका म्हणून नोकरी करत आहे. रविवारी शाळेच्यावतीने पार्टी आणि फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. अंशूला फॅशन शो मध्ये सहभागी व्हायचे होते. पण नवऱ्याचा विरोध होता. त्याने तिला पार्टीला जाण्यासाठी परवानगी दिली.

अंशू आणि आरोपी इंद्रजीतच्या (३५) लग्नाला दहावर्ष झाली आहेत. रविवारी रात्री ११.३०च्या सुमारास इंद्रजीत तिला नेण्यासाठी शाळेजवळ पोहोचला. त्यावेळी शाळा बंद होती. त्याने अंशूला फोन केला व आपल्याशी खोटं बोलल्याचा तिच्यावर आरोप केला. अंशूने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पुरावा म्हणून पार्टी चालू असलेल्या ठिकाणाचा फोटोही व्हॉट्स अॅपवर पाठवला.

इंद्रजीत पार्टीच्या ठिकाणी पोहोचला. त्याने अंशूला फोन करुन तिथून निघण्यास सांगितले. पण तिने नकार दिला. त्यानंतर तिथे लावलेल्या एका मोठया स्क्रीनवर पत्नी अंशू दिसली. त्याने स्क्रिनच्या दिशेने दोन गोळया झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने एकच गोंधळ उडाला. अंशूने इंद्रजीतला पाहिले. त्याला समजावण्यासाठी ती लगेच्या त्याच्या दिशेने चालत आली. पण संतापलेल्या इंद्रजीतने बंदुकीतून तिच्यावर पायावर गोळी झाडली. इंद्रजीत गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्याखाली गुन्हे दाखल आहेत. अंशूवर सध्या उपचार सुरु आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 4:49 pm

Web Title: teacher shot by husband in gurugram
Next Stories
1 तीन दिवसांत आढळले दोन मुलींचे मृतदेह, तेलंगणात सीरिअल किलिंग ?
2 आता विरोधकांचा पराभव किती मोठा असेल एवढेच ठरणार – पंतप्रधान मोदी
3 तुमच्या राजकीय भूमिकेत आम्हाला रस नाही, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारले
Just Now!
X