23 February 2019

News Flash

केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षकांची  ५९००हून अधिक पदे रिक्त

इराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१६ रोजी १० हजार ६७२ पदे उपलब्ध आहेत

विविध केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षकांची ५९२८ पदे रिक्त असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी स्पष्ट केले.

विविध केंद्रीय विद्यापीठांमध्ये शिक्षकांच्या एकूण १६ हजार ६०० जागा असल्याचे मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात सांगितले.

इराणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१६ रोजी १० हजार ६७२ पदे उपलब्ध आहेत, त्यांपैकी ५२९८ पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदे भरण्याची जबाबदारी केंद्रीय विद्यापीठांची आहे, कारण ती स्वायत्त आहेत, असेही इराणी म्हणाल्या.

देशातील ३९ केंद्रीय विद्यापीठांमधील ३४ हजार २७२ शिक्षकेतर पदे मंजूर करण्यात आली असून त्यांपैकी १० हजार १५ पदे १ जानेवारी रोजी रिक्त होती, असेही इराणी यांनी म्हटले आहे.

First Published on April 26, 2016 1:01 am

Web Title: teachers vacancy in central university
टॅग Central University