14 December 2017

News Flash

सुनामीच्या दु:खद आठवणींनी डोळे पाणावले

आठ वर्षांपूर्वी दक्षिण किनारपट्टीवर ‘सुनामी ’वादळाने केलेला उत्पात आजही साऱ्यांच्या स्मरणात आहे. हजारोंच्या संख्येने

पीटीआय चेन्नई | Updated: December 27, 2012 3:31 AM

गमावलेल्या आप्तांना जगभरात श्रद्धांजली
आठ वर्षांपूर्वी दक्षिण किनारपट्टीवर ‘सुनामी ’वादळाने केलेला उत्पात आजही साऱ्यांच्या स्मरणात आहे. हजारोंच्या संख्येने बळी घेणाऱ्या आणि लाखो लोकांना बेघर करणाऱ्या या भीषण घटनेला बुधवारी आठ वर्षे पूर्ण झाली असून तामिळनाडू, पुड्डुचेरीसह दक्षिण किनारपट्टीतील अनेक राज्यांमध्ये नागरिकांनी दुर्घटनेत गमावलेल्या आपल्या आप्तांना साश्रुनयनांनी श्रद्धांजली वाहिली.
अधिक परिचयाचा नसलेल्या ‘त्सुनामी’ या जपानी शब्दाने भारतीय किनारपट्टीतील नागरिकांच्या मनावर कायमचा दिसणारा व्रण उमटवला आहे. इंडोनेशियात समुद्राअंतर्गत झालेल्या भूकंपानंतर त्सुनामीची लाट उसळली आणि या सुनामी लाटेने दक्षिण भारतातील किनारपट्टीच्या राज्यांना जबरदस्त तडाखा दिला. या  सुनामीने हजारोंचे संसार नष्ट झाले. मोठय़ा प्रमाणात झालेल्या जीवित आणि वित्तहानीमुळे त्सुनामीचे संकट आजही लोकांच्या कायमचे लक्षात राहिले आहे. या भीषण घटनेला आज आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या नैसर्गिक आक्रमणाने अनेकांचे प्रियजन त्यांच्यापासून कायमचे दुरावले असून या दुर्घटनेत बळी गेलेल्यांना साश्रुनयनांनी श्रद्धांजली वाहण्यात आली. २००४मध्ये झालेल्या या नैसर्गिक आपत्तीत तामिळनाडूत सुमारे सात हजार जणांचा बळी गेला होता.  चेन्नई येथील प्रसिद्ध मरिना किनाऱ्यावर लोकांनी मेणबत्ती पेटवून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचप्रमाणे तामिळनाडू, पुड्डुचेरी, काराईकल आदी भागांत नागरिकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. किनारपट्टी भागात मच्छीमार संघटनांनी श्रद्धांजली सभांचेही आयोजन केले होते. दरम्यान, त्सुनामीच्या हाहाकारानंतर बेघर झालेल्यांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे हात पुढे आले. पुनर्वसनासाठी अनेक राज्यांतील संघटनांसह महाराष्ट्र सरकारनेही विरमपट्टीनम आणि इतर किनारपट्टीवरील भागात पुनर्वसनाच्या कामात मदत केली होती. पुड्डुचेरी सरकारने त्सुनामीने बेघर झालेल्या मच्छीमारांसाठी मोठय़ा प्रमाणात घरे बांधून दिली. मात्र तरीही   सुनामीने आपल्या प्रियजनांना कायमचे दूर केल्याचे दु:ख आजही येथील नागरिकांच्या डोळ्यात दिसते.    

First Published on December 27, 2012 3:31 am

Web Title: tears in eyes after sad memories of tsunami