22 January 2021

News Flash

विकृती! प्रियकरानेच चार मित्रांच्या सहाय्याने आळीपाळीने केला बलात्कार, घटनेचा व्हिडीओ व्हायरल

पोलिसांकडून गुन्हा दाखल

प्रियकरानेच मित्रांच्या मदतीने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप अल्पवयीन तरुणीने केला आहे. इतकंच नाही तर आपले आक्षेपार्ह व्हिडीओदेखील शूट केले असल्याचं तरुणीने म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथे ही घटना घडली आहे. पीडितेच्या कुटुंबाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.

पीडितेने पोलीस तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, लग्नाचं आश्वासन देऊन प्रियकर गेल्या एक वर्षांपासून आपल्यावर लैंगिक अत्याचार करत होता. आरोपीने आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ मोबाइलमध्ये रेकॉर्ड केले असून १ जानेवारीला व्हायरल केले. यानंतर त्याने आपल्याला ब्लॅकमेल केलं. त्याच्या मित्रांकडूनही आपल्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आला.

आणखी वाचा- नात्याला काळीमा! मोठ्या भावाचा विवाहित बहिणीवर बलात्कार, व्हिडीओही बनवला

आरोपीने शूट केलेले व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांकडून तक्रार दाखल करण्यात आली. प्रियकर आणि त्याच्या मित्रांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींना तसंच व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 8:41 am

Web Title: teen raped by boyfriend with friends bareilly uttar pradesh sgy 87
Next Stories
1 कृषी कायद्यांना स्थगिती
2 घराणेशाहीचे राजकारण हा लोकशाहीचा मोठा शत्रू
3 दहशतवादी घोषित करण्याच्या प्रक्रियेत अकारण खोडा नको – जयशंकर
Just Now!
X