05 July 2020

News Flash

धक्कादायक : उत्तर प्रदेशात दोन किशोरवयीन बहिणींना पेटवले

दोन बहिणी पलंगावर झोपलेल्या असताना पेट्रोल टाकून पेटवले

पीडित बहिणींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गोरखपूरमधील रुग्णालयात लहान मुलांचा करूण अंत झाल्याची घटना ताजी असतानाच बरेली जिल्ह्यातही एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. घरात पलंगावर दोन किशोरवयीन बहिणी झोपलेल्या असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या पलंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले. यामध्ये या मुली गंभीररित्या भाजल्या असून एकीची प्रकृती नाजूक आहे. शुक्रवारी मध्यरात्री बरेली जिल्ह्यातील नवाबगंज भागात ही घटना घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेत १८ वर्षीय गुलशन या मुलीची प्रकृती गंभीर आहे. तर तिची १७ वर्षीय बहिण फिजा ही ४० टक्के भाजली असून ती देखील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. आरोपी शुक्रवारी मध्यरात्री या मुलींच्या घरात शिरले त्यानंतर या मुली झोपलेल्या पलंगावर त्यांनी पेट्रोल टाकले आणि पलंग पेटवून दिला. आग लागल्याचा प्रकार घरातल्या मंडळींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या दोन्ही बहिणींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.

“काही लोकांनी शुक्रवारच्या रात्री २ वाजता आमच्या घरात शिरुन मी आणि माझी बहिण झोपलेल्या पलंगावर पेट्रोल टाकले आणि पंलंग पेटवून दिला. मात्र, हे लोक कोण होते ते आम्हाला ठाऊक नाही. जेव्हा आम्हाला जाग आली तेव्हा ते पळून गेले होते. आम्ही त्यांचे चेहरे पाहू शकलो नाही” असे फिजा या पीडित मुलीने पोलिसांच्या जबाबात सांगितले.

“हे कृत्य करणारे लोक कोण होते, हे आम्हाला कळू शकलेले नाही. आमचे कुणाहीशी वैर नव्हते” असे पीडित मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी खास पथक तयार केले आहे. गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2017 11:44 am

Web Title: teen sisters set on fire in sleep by unknown miscreants in ups bareilly
Next Stories
1 उत्तर प्रदेश: गोरखपूर रुग्णालयात आणखी एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; मृतांचा आकडा ६३ वर
2 पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन; मेंढार सेक्टरमध्ये महिला ठार
3 ‘भारतीय सैन्य कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास सज्ज!’
Just Now!
X