06 March 2021

News Flash

मुलाचा मृतदेह असलेली बॅग घेऊन तिने खरेदी केली…

एका आईने तिच्या नवजात अर्भकाला ठार मारल्यानंतर त्याचा मृतदेह असलेली बॅग घेऊन खरेदीला गेल्याची घटना प्रकाशात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती.

| July 31, 2015 03:26 am

अमेरिकेत काही वर्षांपूर्वी एका आईने तिच्या नवजात अर्भकाला ठार मारल्यानंतर त्याचा मृतदेह असलेली बॅग घेऊन खरेदीला गेल्याची घटना प्रकाशात आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. साधारण दोन वर्षांपूर्वी टिओना रॉड्रिग्झ या अल्पवयीन मातेला या घृणास्पद कृत्यासाठी अटक करण्यात आली होती. न्यूयॉर्कच्या व्हिक्टोरियाज सिक्रेट येथे खरेदी करत असताना दुकानातील वस्तू चोरल्याच्या संशयामुळे तिला पकडण्यात आल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला होता. यावेळी तिच्या बॅगेची झडती घेण्यात आल्यानंतर त्यामध्ये ८ पौडांचे मृत अर्भक पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. दरम्यान, या घटनेनंतर पोलीसांनी टिओनाला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा टिओनाने सुरूवातीपासूनच स्वत:च्या मुलाला मारण्याचा कट रचल्याचे पुरावे समोर आले होते. तिच्या मोबाईलवर काहीजणांना ‘खड्डा खण’, ‘याला कुठेतरी नेऊन टाक’ (मृतदेहाला उद्देशून) असे संदेश पाठवण्यात आले होते. सध्या या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असून टिओनाने आपण दोषी नसल्याचा दावा केला आहे. मात्र, टिओनाने तिच्या नवजात अर्भकाला श्वास कोंडून मारल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे. दरम्यान, बचावपक्षाच्या वकिलांनी ही घटना घडली तेव्हा टिओना अल्पवयीन असल्याने तिला मातृत्वाची पुरेशी कल्पना नसल्याचे सांगितले. टिओनाला स्वत:ला ती गर्भवती असल्याचे माहित नव्हते. तसेच मूल मृत झाल्याचे तिच्या लक्षात आले नव्हते. गोंधळाच्या अवस्थेत तिच्याकडून हा सगळा प्रकार घडल्याचे तिच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2015 3:26 am

Web Title: teenage mother kills newborn baby then goes shopping with dead body
Next Stories
1 ‘बजरंगी भाईजान’ पाहण्यासाठी पाकिस्तानात प्रेक्षकांची गर्दी
2 चीनमध्ये विजेवरील बसचा सार्वजनिक वाहतुकीत वापर
3 उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड पोलीस चकमकीत ठार
Just Now!
X