पूर्णत: स्वदेशी बनावटीचे, ध्वनिवेगातीत लढाऊ विमान ‘एलसीए- तेजस’ शुक्रवारी भारतीय वायुदलात समावेशाच्या दिशेने महत्त्वपूर्ण भरारी मारणार आह़े  या विमानाच्या उड्डाण सज्जतेच्या प्राथमिक चाचणीचे (इनिशिएल ऑपरेशनल क्लिअरन्स-२) प्रमाणपत्र शुक्रवारी देण्यात येणार आह़े  विमानाच्या वायुदल ताफ्यात समावेशाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वपूर्ण चाचणी मानली जात़े
हलक्या वजनाचे हे विमान एका इंजिनाचे आणि चपळ लढाऊ आह़े  येथे होणाऱ्या एका समारंभात संरक्षणमंत्री ए़  के. अॅण्टोनी यांच्या उपस्थितीत विमानाला हे प्रमाणपत्र देण्यात येणार आह़े  त्यानंतर या विमानांचे उत्पादन ‘हिंदुस्थान अॅरोनोटिक्स लिमिटेड’(एचएएल)मध्ये करण्यात येणार असून २०१४ पासून ही विमाने वायुदलाकडे देण्यास प्रारंभ होईल, असे एचएएलकडून सांगण्यात आले आह़े
सुरुवातीला दरवर्षी आठ तेजस विमाने बनविण्याची आमची योजना आह़े  त्यानंतर वायुदल आणि संरक्षण मंत्रालयाशी चर्चा करून प्रतिवर्ष १६ विमानेपर्यंत उत्पादन वाढविण्याचा विचार असल्याचे एचएएलचे अध्यक्ष डॉ़  आऱ  के. त्यागी यांनी सांगितल़े  या विमानांच्या उत्पादनासाठी एचएएल पूर्णत: सज्ज असून ग्राहकाची मागणी वेळेत पूर्ण करण्यासही कटिबद्ध असल्याचेही म्हणाल़े  ‘तेजस’च्या उत्पादनासाठी एचएएल पायाभूत सुविधा तयार करीत असल्याचेही ते म्हणाल़े
मात्र या विमानाने प्राथमिक चाचणी पार केलेली असली तरीही मुख्य चाचणीतून पार पडेपर्यंत त्याला अनेक टप्प्यांतून जावे लागणार आह़े या वर्षी  विविध हवामानातील कार्यक्षमता तपासण्यासाठी लेह, जामनगर, जैसलमेर, उत्तरालय ग्वाल्हेर, पठाणकोट आणि गोवा या ठिकाणी ‘तेजस’ची चाचणी घेण्यात आली़  तसेच रडारच्या आवाक्यात आणि क्षेपणास्त्रांच्या टप्प्यात ते येते का याचीही चाचणी करण्यात आली आहे, असेही त्यांनी यांनी सांगितल़े