News Flash

“सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन भाजपा बंगालमध्ये आली, पण ‘नवरा’ कोण आहे?”

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या एकातरी नेत्याचं नाव सांगून दाखवा

(केंद्रीय गृहमंत्री यांचे मिदनापूर येथील रॅलीदरम्यानचे संग्रहित छायचित्र)

बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेता तेजस्वी यादव यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बंगाल दौऱ्यावर असलेल्या तेजस्वी यादव यांनी भाजपावर खरमरीत टीका केली आहे.

“भाजपा इतका मोठा पक्ष आहे, पण सर्व केंद्रीय मंत्र्यांची वरात घेऊन भाजपा बंगालमध्ये आली आहे. मात्र बोहल्यावर बसणारा नवरा कोण आहे? मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यापेक्षा जास्त अनुभव असलेल्या एकातरी नेत्याचं नाव सांगून दाखवा. ज्यांना विधानसभेचा अुभवच नाहीये तुम्ही त्यांच्याकडे सत्ता सोपवणार का?” असा सवाल तेजस्वी यांनी विचारला. बंगालमध्ये भाजपाकडे मुख्यमंत्रीपदाचा एकही उमेदवार नसल्याचं म्हणत तेजस्वी यांनी भाजपावर टीकास्त्र सोडलं.

आणखी वाचा- ममतांना पाठिंबा देण्याचे बंगालमधील बिहारींना आवाहन!

आणखी वाचा- पश्चिम बंगालमधील ‘एमआयएम’च्या रणनीतीबाबत ओवेसींचा सूचक इशारा

तसेच, बिहार निवडणुकांबाबत बोलताना “आम्ही हरलो नाही तर आम्हाला हरवण्यात आलं, बिहारचं सध्याचं सरकार चोर दरवाज्यातून आलं आहे, बिहारची जनता ही बाब खूप चांगली समजते” असंही तेजस्वी म्हणाले. दरम्यान, पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठी तृणमूल काँग्रेससोबत गठबंधन करणार असल्याची चर्चा असतानाच राष्ट्रीय जनता दलाचे नेता तेजस्वी यादव यांनी सोमवारी तृणमूलच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा काय झाली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही, पण निवडणुकीत गठबंधनाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 12:37 pm

Web Title: tejashwi yadav says bjp dont have any leader to fight against mamata banerjee in west bengal sas 89
Next Stories
1 Video: प्रियंका गांधींची ‘चाय की बात’; थेट मळ्यात जाऊन केली चहाच्या पानांची तोडणी
2 आता संसद टीव्ही! लोकसभा-राज्यसभा टीव्ही चॅनेलचं सरकारकडून विलीनीकरण
3 VIDEO: भटक्या कुत्र्यांना खाऊ घातल्याने सोसायटीने कुटुंबाला ठेवलं ओलीस; पोलिसांना करावी लागली मध्यस्थी
Just Now!
X