05 March 2021

News Flash

पंतप्रधान होण्यासाठीचे सर्व गुण राहुल गांधींकडे: तेजस्वी यादव

ते भारतातील सर्वांत जुन्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या पक्षाचे देशात ५ मुख्यमंत्री असून त्यांचे ते नेतृत्व करतात, हे विसरू नका.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिनेच शिल्लक आहेत. आघाडीचे, फाटाफुटीचे राजकारण सुरू झाले आहे. एनडीएत सध्यातरी नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचा चेहरा आहेत. तर विरोधी पक्षाकडून अजून तरी कोणालाही पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित करण्यात आलेले नाही. पण, सर्वांत मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे मोठे कौतुक मात्र सुरू आहे. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राहुल यांचे कौतुक करत त्यांच्याकडे उत्कृष्ठ पंतप्रधान होण्याचे सर्व गुण असल्याचे म्हटले आहे.

राहुल गांधी यांच्याकडे पंतप्रधान होण्यासाठीचे सर्व गुण आहेत. त्यांच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित केले जाऊ नयेत. देशाचा पुढील पंतप्रधान कोण असेल, असा प्रश्न त्यांना विचारला त्यांनी याचे उत्तर २०१९ मधील लोकसभा निवडणुकीनंतर महाआघाडीचे घटक पक्ष सामूहिकरित्या ठरवतील, असेही स्पष्ट केले. तेजस्वी यादव यांच्यापूर्वी द्रमुकचे नेते एम के स्टालिन यांनीही राहुल गांधी यांनी पंतप्रधान व्हावे असे म्हटले होते.

‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्वी यादव म्हणाले की, आपल्याविरोधात चालवण्यात आलेल्या दीर्घकालीन नकारात्मक अभियानानंतरही त्यांनी (राहुल गांधी) आपली दृढता, दयाळूपणा या जोरावर लोकांची मनं जिंकली. तीन प्रमुख राज्यात काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर त्यांनी पक्ष आणि ६९ टक्के मतदारांच्या मनात आत्मविश्वास आणि ऊर्जा निर्माण करून दिली आहे.

त्याचबरोबर त्यांच्याकडे पंतप्रधान होण्याचे सर्व गुण आहेत. ते भारतातील सर्वांत जुन्या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि मागील १५ वर्षांपासून संसदेचे सदस्य आहेत. त्यांच्या पक्षाचे देशात ५ मुख्यमंत्री असून त्यांचे ते नेतृत्व करतात, हे विसरू नका. त्यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करू नका.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 27, 2019 10:09 pm

Web Title: tejashwi yadav says rahul gandhi has all quality to be prime minister of india
Next Stories
1 जम्मू-काश्मीर: शोपियांत लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, चकमक सुरू
2 राष्ट्रविरोधी शक्तींना देशातील शांतता भंग करायची आहे: मोहन भागवत
3 अयोध्या प्रकरण: २९ जानेवारीस न्यायाधीश उपलब्ध नसल्याने सुनावणी पुढे ढकलली
Just Now!
X