तेलंगणा विधानसभेत भाजपाचा दारूण पराभव झाला आहे. विधानसभेच्या ११९ जागांपैकी भाजपाला फक्त १ जागा जिंकता आली आहे. टीडीपी आणि काँग्रेसने मिळून २१ जागा मिळवल्या आहेत. तर तेलंगणाच्या जनतेने टीआरएस आणि AIMIM ला ९५ जागांवर विजयी करत त्यांच्या हाती सत्ता दिली आहे. आता या ठिकाणी मुख्यमंत्री कोण होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

या निवडणुका जिंकल्यानंतर ओवेसी यांनी भाजपा आणि काँग्रेसच्या अहंकाराचा पराभव झाला अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच २०१९ मध्येही आम्ही ताकदीने लढू असेही सांगितले आहे. पत्रकारांनी तुमची  व्होट बँक काय असा प्रश्न ओवेसींना विचारला असता सगळा देश माझी व्होट बँक आहे असेही ओवेसी यांनी म्हटले आहे.

Live Blog

17:58 (IST)11 Dec 2018
के. चंद्रशेखर राव सारख्या नेत्यांची देशाला गरज - असदुद्दीन ओवेसी

के. चंद्रशेखर राव सारख्या नेत्यांची देशाला गरज आहे. यापुढे ते जे पाऊल उचलतील ते यशस्वीच असेल अशी मला आशा आहे. त्यासाठी मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. त्यामुळे आता २०१९च्या निवडणुकीत काँग्रेसरहित आणि भाजपारहित सरकार स्थापन होईल.

17:53 (IST)11 Dec 2018
आता मी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय होईल - केसीआर
16:49 (IST)11 Dec 2018
विजय नोंदवल्यानंतर टीआरएसप्रमुख चंद्रशेखर राव मुख्यालयात
16:46 (IST)11 Dec 2018
केटी रामा राव यांनी कार्यकर्त्यांची घेतली भेट

निवडणूक आयोगाच्या अधिकृत माहितीनुसार, टीआरएस ७९ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, तेलंगणाचे काळजीवाहू मंत्री केटी रामा राव यांनी आपल्या कार्यकर्त्यांची हैदराबाद येथील मुख्यालयात भेट घेतली. टीआरएस तेलंगणात सर्वात पुढे आहे.

15:49 (IST)11 Dec 2018
टीआरएस उमेदवार तलासनी यादव विजयी
14:59 (IST)11 Dec 2018
के. चंद्रशेखर राव विजयी

टीआरएसचे प्रमुख आणि तेलंगणाचे काळजीवाहू मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव गजवेल मतदारसंघातून ५०,००० मताधिक्याने विजयी. 

13:58 (IST)11 Dec 2018
Results Live: अब की बार, काँग्रेस सरकार

13:55 (IST)11 Dec 2018
भाजपाला हादरा?, चार राज्यात काँग्रेस आघाडीवर

13:07 (IST)11 Dec 2018
जनतेनं दिलेला कौल काँग्रेस खोटा कसं ठरवू शकतं - टीआरएस

हारणारा पक्ष नेहमीच मतदान यंत्रांमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप करीत असते. त्यामुळे काँग्रेसने केलेला आरोप खोटा असून कालच निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले होते की, मतदान यंत्रांमध्ये छेडछाड करणे शक्य नाही. तेलंगणाच्या जनतेने टीआरएसला जिंकून दिले त्याला काँग्रेस खोटं कसं ठरवू शकते, असे टीआरएसच्या नेत्या के. कविता यांनी म्हटले आहे.

12:17 (IST)11 Dec 2018
इव्हीएममध्ये छेडछाडीचा काँग्रेसचा आरोप

results : तेलंगणात पिछाडीवर पडलेल्या काँग्रेसने मतदान यंत्रांवर आक्षेप घेतला आहे. आम्हाला इव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा संशय आहे, त्यामुळे व्हीव्हीपॅटमधील स्लिप्सची मोजणी करण्यात यावी अशी मागणी तेलंगणा प्रदेश काँग्रेसचे सदस्य उत्तम कुमार रेड्डी यांनी केली आहे.

12:02 (IST)11 Dec 2018
ECI trends: टीआरएस ९० जागांसह आघाडीवर
10:55 (IST)11 Dec 2018
टीआरएसच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
10:22 (IST)11 Dec 2018
टीआरएसचा बहुमताचा आकडा पार

तेलंगणात टीआरस आणि एमआयएम युतीने बहुमताचा आकडा पार केला आहे. ते सध्या ८२ जागांवर आघाडीवर असून टीडीपी-काँग्रेस युतीला २५, भाजपा ६ तर इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे तेलंगणात पुन्हा एकदा टीआरएस-एमआयएमची सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे.

10:09 (IST)11 Dec 2018
मतदार टीआरएसला पुन्हा सत्तेत आणतील - के. कविता

तेलंगणातील लोक आमच्यासोबत असल्याचा आमचा विश्वास आहे. तेलंगणात आम्ही गांभीर्याने कामे केली आहेत, तसेच इथल्या जनतेने आम्हाला दिलेल्या संधीचा आम्ही विकासकामांसाठी वापर केला आहे. त्यामुळे तेलंगणाचे मतदार आम्हाला पुन्हा सत्तेत बसवतील याचा आम्हाला विश्वास आहे, असे मत टीआरएसच्या खासदार के. कविता यांनी व्यक्त केले आहे.

09:58 (IST)11 Dec 2018
एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी
09:55 (IST)11 Dec 2018
टीआरएस १२ जागांवर पुढे