News Flash

विधानसभाध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान

तेलगु देशमचे विधानसभेतील संख्याबळ १५ वरून तीनवर आले.

| March 13, 2016 02:51 am

 

पक्षांतर करून सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीचे सदस्य झालेल्या तेलगु देशमच्या १२ आमदारांना मान्यता देण्याच्या तेलंगणा विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आपण आव्हान देणार असल्याचे तेलगु देशम पक्षाने म्हटले आहे. हे घटनेचे उल्लंघन असून आम्ही त्याविरुद्ध न्यायालयात लढा देऊ, असे तेलगु देशमचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष एल. रामण्णा यांनी एका निवेदनात सांगितले.दरम्यान, या बारापैकी एम. गोपीनाथ व ए. गांधी या दोन आमदारांनी शनिवारी अधिकृतरीत्या टीआरएसमध्ये प्रवेश केला. तेलगु देशमचे विधानसभेतील संख्याबळ १५ वरून तीनवर आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2016 1:00 am

Web Title: telangana assembly speaker issue
Next Stories
1 व्हिडिओ: नितीश कुमारांच्या भाषणावेळी मोदीनामाचा गजर करणाऱ्यांना मोदींनी बसवले शांत !
2 विजय मल्ल्या कर्नाटकचा सुपूत्र; तो पळून गेलेला नाही- देवेगौडा
3 ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली ‘आझादी’च्या घोषणा खपवून घेतल्या जाणार नाहीत’
Just Now!
X