नव्या वर्षांच्या सुरुवातीलाच तेलंगणात स्वाइन फ्लूमुळे ११ जणांचे बळी घेतले असून राज्य सरकारने या रोगाचा प्रसार होऊ नये यासाठी केंद्र सरकारची मदत मागितली आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून त्यांना केंद्राचे पथक पाठवण्यास सांगितले आहे.
मुख्यमंत्री राव यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली असून राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली आहे. थंड हवामान व वारे २० दिवस राहण्याची शक्यता असून लोकांनी सावधानता बाळगावी. मुख्य सचिवांनी लस उपलब्घ करून द्याव्यात व त्यात किमतीची काळजी करू नये, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तेलंगणातून केंद्रीय कामगार मंत्री झालेले बंदारू दत्तात्रेय यांनीही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली.