15 August 2020

News Flash

तेलंगणा : पळून जाण्याच्या केलेल्या प्रयत्नात सिमीचे पाच आरोपी ठार

वारंगल कारागृहातून हैदराबाद न्यायालयात नेताना पलायन करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सिमीचे पाच कार्यकर्ते ठार झाले.

| April 7, 2015 12:26 pm

वारंगल कारागृहातून हैदराबाद न्यायालयात नेताना पलायन करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सिमीचे पाच कार्यकर्ते ठार झाले. तेलंगणाजवळील जनागाव येथे आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
ठार झालेल्या आरोपींमध्ये हैदराबाद पोलिसांवर गोळीबार करणारा सिमीचा कार्यकर्ता विकरूद्दीनचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त पोलिसांवर गोळाबार करण्यात आल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सुलेमान, झकीर, आझाद आणि असिफ या सिमीच्या इतर चार संशयित कार्यकर्त्यांचा समावेश आहे. यापैकी विकरूद्दीनचा पाकिस्तानच्या ‘आयएसआय’शी जवळचा संबंध होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2015 12:26 pm

Web Title: telangana five alleged simi activists shot dead on way to court
टॅग Court,Telangana
Next Stories
1 जमीन अधिग्रहणविरोधी आंदोलनात राहुल अवतरणार
2 कार्बन उत्सर्जनासंबंधी दबावास जुमानणार नाही
3 नरेंद्र मोदींच्या जन्मठिकाणाला भेट द्या ६०० रूपयांत, गुजरात पर्यटन महामंडळाचा उपक्रम
Just Now!
X