स्वतंत्र तेलंगणच्या विरोधात वायएसआर काँग्रेसचे नेते वाय.एस.जगन मोहन रेड्डी यांनी आजपासून (शनिवार) आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे. आंध्र प्रदेशाचे विभाजन करण्याच्या निर्णयामुळे किनारी व रायलसीमा यांचा एकत्र भाग असलेल्या सीमांध्रात आज दुसऱया दिवशीही कडकडीत बंद पाळण्यात आला असून तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
सीमांध्रमध्ये प्रक्षोभ
जगनमोहन यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सीमांध्र भागातून मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र झाले आहेत. या निर्णयाविरोधात सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन रेड्डी यांनी केले आहे.
सर्व राष्ट्रीय व राज्य महामार्ग रोखण्यात आले, शाळा-महाविद्यालये, सरकारी कार्यालये बंद करण्यात आली आहेत. तर, काही ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले झाले आहेत.
वेगळ्या तेलंगणाचा आता फेरविचार नाही – दिग्विजय सिंह