News Flash

करोनामुळे तेलुगू अभिनेते टीएनआर यांचे निधन

आज सकाळी त्यांचे निधन झाले.

तेलुगू चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय यूट्यूब होस्ट, पत्रकार आणि अभिनेते टीएनआर उर्फ थुम्मुला नरसिम्हा रेड्डी यांचे करोनामुळे निधन झाले आहे. आज सकाळी हैदराबाद येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

अभिनेते नानी यांनी टीएनआर यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ‘टीएनआर यांचे निधन झाले ऐकून धक्काच बसला. मी त्यांच्या काही मुलाखती पाहिल्या आहेत. त्यांचा एकंदरीत अभ्यास दांडगा होता. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो’ असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

टीएनआर यांचे मित्र दिग्दर्शक मारुथी यांनी देखील ट्विटरद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे. ‘धक्कादायक आहे हे. माझा विश्वासच बसत नाही. माझा मित्र आम्हाला सोडून गेला’ असे त्यांनी म्हटले आहे. टीएनआर यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकजण सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

टीएनआर यांनी बोनी, नेने राजु नेने मंत्री, जॉर्ज रेड्डी या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच चे फ्रँकली स्पिकिंग चॅनेलवर अनेक प्रसिद्ध कलाकारांची मुलाखत घेत असत. ते प्रचंड लोकप्रिय होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 5:05 pm

Web Title: telugu actor thummala narsimha reddy aka tnr dies of covid 19 avb 95
Next Stories
1 मोफत शववाहिनी व ऑक्सिजन लंगरची सेवा, गुरूद्वाराचा कौतुकास्पद उपक्रम
2 काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या निर्णयाला काही तासातच स्थगिती
3 Fact Check: कोव्हिड मृतांचे आकडे लपविण्यासाठी गंगा नदीत मृतदेह फेकल्याचा दावा
Just Now!
X