दक्षिण भारतातील आघाडीच्या चित्रपट अभिनेत्री आरती अगरवाल यांचा अमेरिकेतील न्यूजर्सी येथे शस्त्रक्रियेनंतर मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
आरती यांच्यावर येथील रुग्णालयात लठ्ठपणा (चरबी) कमी करण्याची (लिपोसक्शन) शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर काही सूत्रांच्या आधारे त्यांच्या श्वसनक्रियेत अडथळा आल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा सपाटा लावला.
आरती यांचा जन्म ५ मार्च १९८५ रोजी न्यूजर्सी येथे झाला. अनिता १४ वर्षांच्या असताना बॉलीवूड अभिनेता सुनील शेट्टी यांनी फिलाडेल्फिया येथील एका कार्यक्रमात त्यांचे कलागुण हेरले आणि त्यांच्या पालकांना त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्याचा सल्ला दिला. वयाच्या १६ व्या वर्षी आरती यांनी पागलपन या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले.
आरती यांचे नशीब दाक्षिणात्य चित्रपटांत खऱ्या अर्थाने उजळले. तेथील ‘नुव्वू नाकू नाचव’ या चित्रपटाने त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. नुव्वूलेका नेनुलेनु, इंद्र, बॉबी, वसंथम, अदावी रामुडू हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. त्यांचा रणम-२ हा चित्रपट (५ जून रोजी) प्रदर्शित झाला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 7, 2015 4:40 am