संसदेत सत्ताधारी यूपीएने मांडलेल्या स्वतंत्र तेलंगण विधेयकाला भाजपने पाठिंबा दिल्यामुळे तेलगू देसम पार्टीत (टीडीपी) नाराजी आह़े  त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपशी युती करण्याबाबत टीडीपीच्या नेत्यांमध्ये साशंकता आह़े  टीडीपीने अद्याप अधिकृतरीत्या भाजपशी युतीची घोषणा केली नसली तरीही टीडीपीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यातील सध्याचे सलोख्याचे संबंध पाहता, युतीची दाट शक्यता वर्तविण्यात येत होती़ हे विधेयक अन्याय्य आहे, असे सांगत टीडीपीने सुरुवातीपासून विधेयकाला विरोध केला होता, परंतु भाजपने विधेयक संमत होण्याला कोणताही विरोध केला नाही़  ‘आंध्र प्रदेशला दिवाळखोर राज्य करण्यात काँग्रेस इतकेच भाजपही दोषी आह़े  यामुळे दोन्ही पक्षांना येत्या लोकसभा निवडणुकांत मोठे नुकसान सोसावे लागेल़  सीमांध्रासाठी पॅकेजची घोषण हीसुद्धा धूळफेकच आहे’ असे टीडीपीचे पॉलिटब्युरो सदस्य यनामाला रामक्रिश्नुदू यांनी गुरुवारी म्हटले होत़े