विश्व हिंदू परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी अयोध्ये राम मंदिर उभारण्यावरुन वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्या पद्धतीने मशिदीची वास्तू पाडण्यात आली. त्याचपद्धतीने मंदिर उभारले जाईल. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागाे, अयोध्येत राम मंदिरच उभारणार असल्याचे ठामपणे साध्वी प्राची यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या, राम मंदिरप्रकरणी लवकर निकाल यावा यासाठी आम्ही या खटल्याच्या सुनावणीसाठी वेगळ्या खंडपीठाची मागणी केली होती. दीर्घकाळापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. आम्हाला फक्त तारखाच मिळत आहेत. आता सर्व हिंदू निर्णयाची प्रतिक्षा करत आहेत. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर निर्णय आला पाहिजे. हिंदू आणि राम भक्तांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. आता संयम सुटत चालला आहे, असा इशाराही दिला.
दरम्यान, अयोध्येत राम मंदिर-बाबरी मशीद जमीन वादाप्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुन्हा एकदा जानेवारी २०१९ पर्यंत पुढे गेली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 30, 2018 12:53 pm