पश्चिम बंगालमधील मालदा वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. या रूग्णालयात ७२ तासात १० नवजात बालके मरण पावली असून याआधीही तेथे अनेकदा नवजात बालके दगावली आहेत.
वैद्यकीय अधीक्षक व उपप्राचार्य अमित डॉन यांनी सांगितले की, कालपासून ही नवजात बालके मृत्युमुखी पडली असून त्यांचे वजन ९६० ग्रॅम होते, म्हणजेच ती अपेक्षेपेक्षा खूप कमी वजनाची होती. या बालकांना रूग्णालयात आणले असता त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. गेल्या ७२ तासात एकूण दहा बालकांचा मृत्यू झाला आहे. पाच सदस्यीय चौकशी समिती या घटनांच्या कारणांचा शोध घेण्याकरिता नेमली असून या घटना टाळण्यासाठी मंगळवापर्यंत अहवाल मागवण्यात आला आहे.