लोकसभा अध्यक्षपदासाठी एनडीएकडून खासदार ओम बिर्ला यांचे नाव निश्चित करण्यात आल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यांची या पदावर निवड निश्चित मानली जात असताना आता दहा पक्षांनी त्यांना पाठींबा दिला आहे.

नॅशनल पीपल्स पार्टी, मिझो नॅशनल फ्रंट, लोक जनशक्ती पार्टी, वायएसआरसीपी, जेडीयू, एआयएडीएमके, अपना दल आणि बिजू जनता दल यासह १० राजकीय पक्षांनी लोकसभा सभापतीच्या ओम बिर्ला यांच्या उमेदवारीस समर्थन दिले आहे.

बिजू जनता दलास लोकसभेचे उपाध्यक्ष पद दिले जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर एनडीएचे उमेदवार असलेल्या ओम बिर्ला यांना पाठिंबा देण्याचा ठरावही बिजू जनता दलाने पारीत केला आहे. ओम बिर्ला उमेदवारी अर्ज आज दाखल करत आहेत.