News Flash

मोदी मायदेशी परतताच बांगलादेशात मंदिरावर हल्ला

मोदी हे भारतातील मुस्लिमांशी भेदभाव करत असल्याचा आरोप करत त्यांच्या दौऱ्याला   विरोध झाला.

(संग्रहित छायाचित्र)

 

वृत्तसंस्था, कॉक्स बाजार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बांगलादेश दौऱ्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनात १० जण ठार झाले असून मोदी मायदेशी परतल्यानंतर हे आंदोलन अधिक हिंसक झाले. हिंदूंच्या मंदिरावर हल्ला करण्यात आला. यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने पोलीस आणि स्थानिक पत्रकाराच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. बांगलादेश स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर होते. मोदी हे भारतातील मुस्लिमांशी भेदभाव करत असल्याचा आरोप करत त्यांच्या दौऱ्याला   विरोध झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 12:21 am

Web Title: ten people were killed in an agitation against prime minister narendra modi visit to bangladesh akp 94
Next Stories
1 विदेशातून येणारी उड्डाणे थांबवा
2 पश्चिम बंगालमध्ये दोनशेहून अधिक जागा जिंकू : शहा
3 ध्रुवीकरणाच्या राजकारणावर विश्वास नाही – राजनाथ सिंह
Just Now!
X