अफगाणिस्तानातील काबूल विश्वविद्यालयावर सोमवारी दहशतवादी हल्ला झाला. यामध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. २२ जण या दहशतवादी हल्ल्यात जखमी झाले आहेत. घटनास्थळी सुरक्षा पथकं आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. संपूर्ण कॅम्पसला सुरक्षा पथकांनी घेराव घातला आहे.

कॅम्पसच्या आत गोळीबार सुरु आहे. अफगाण आणि इराणी अधिकारी विश्वविद्यालयाच्या आत एक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन करत असताना गोळीबाराची ही घटना घडली. बंदूकधाऱ्यांच्या एका गटाने आज दुपारी विश्वविद्यालयाच्या परिसरात गोळीबार केला असे अफगाणिस्तानातील सरकारचे प्रवक्ते तारिक एरियन यांनी सांगितले.

या हल्ल्यानंतर अफगाणिस्तान स्पेशल फोर्सेस आणि परदेशी कमांडोजची टीम या भागात दाखल झाली आहे. मागच्या पाच तासांपासून सुरक्षा पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. विश्वविद्यालयाच्या दिशेने जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.