अमेरिकेत झालेल्या ९/११ दहशतवादी हल्ल्याच्या आठवणींसंदर्भात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पाकिस्तानवर हल्लाबोल केला. दहशतवाद एक विचारधारा बनली असून कुठल्याही एका देशापुरता मर्यादीत नाही. दहशतवाद एक जागतिक समस्या असून यापासून संपूर्ण जगाला धोका आहे. आपल्या शेजारच्या देशात दहशतवादाची पाळेमुळे असून तिथे तो फोफावत आहे असे मोदी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वच्छता ही सेवा कार्यक्रमात मोदी बोलत होते. शतकापूर्वी स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमध्ये दिलेल्या ऐतिहासिक भाषणातून जगाला आपल्या संस्कृतीबद्दल समजले. पण दुर्देवाने ११ सप्टेंबरलाच अमेरिकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने जग हादरले असे मोदी म्हणाले. भूतकाळात भारताने दहशतवादाविरुद्ध ठोस भूमिका घेतली आणि भविष्यातही कायम राहिल असे मोदी म्हणाले.

दहशतवादाला आसारा देणारे त्यांना प्रशिक्षण देणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याचा जगाने संकल्प केला पाहिजे. भारत दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम आहे असे मोदी म्हणाले.

ओम आणि गाय शब्द ऐकताच काहींना वाटतं देश १६व्या शतकात
मथुरेच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरक्षेच्या मुद्यावरून विरोधकांवर हल्लाबोल केला. “या देशात ही दुर्भाग्याची गोष्ट आहे की, ओम आणि गाय हे शब्द कानावर पडले तर काही लोकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यांना देश पुन्हा १६व्या शतकात गेल्यासारख वाटतं. अस ज्ञान सांगणाऱ्यांनी देशाला बर्बाद केल आहे आहे”, अशी टीका मोदी यांनी विरोधकांवर केली.

दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील मथुरेचा दौरा केला. मोदी यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजनासह शेतकऱ्यांसाठीच्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण योजनेची घोषणा करत प्लास्टिक मुक्त भारतासह ‘जय किसान’चा नारा दिला.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले, “लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर पहिल्यांदाच कृष्णाच्या नगरीत येण्याचे भाग्य मिळाले आहे. जनादेश मिळाल्यानंतर सरकारने तुमच्या अपेक्षेप्रमाणेच अभूतपूर्व काम करून दाखवले आहे. देशाच्या विकासासाठी तुमचे समर्थन सदैव मिळत राहिल. आज संपूर्ण विश्व पर्यावरण संरक्षणासाठी रोल मॉडलचा शोध घेत आहे. पण, भारताकडे भगवान श्रीकृष्णासारखा प्रेरणास्त्रोत आहे. ज्यांच्याशिवाय पर्यावरण प्रेमाची कल्पनाच अपूर्ण आहे”, असे मोदी म्हणाले.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terrorism global threat deep roots in pakistan 911 america world trade center attack pm narendra modi swacchata hi seva dmp
First published on: 11-09-2019 at 17:49 IST